शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २३ हजार इंग्रजी शाळांची आर्थिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:53 IST

सहा लाख शिक्षकांचे वेतनही थकले; शुल्कही जमा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यभरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील सहा लाख शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. शैक्षणिक सत्र सुरू न झाल्याने पालकांनी शुल्क भरलेले नाही. त्यामुळे संस्थांनी पगार दिलेले नाहीत. यासंदर्भात इंडिपेंडंट इंंग्लिश स्कूल्स असोसिएशनच्या (इसा) पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची अलीकडेच भेट घेऊन गाºहाणे मांडले.‘इसा’चे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी सांगितले की, पुण्या-मुंबईसह राज्यभरातील २३ हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळा १४ मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे त्यांचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. या शाळांतील सहा लाख शिक्षकांना मे महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. शिवाय स्कूल बसचालक, शिपाई कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी दीड लाख जणांनाही वेतन मिळालेले नाही. मार्च व एप्रिलमध्ये संस्थांनी स्वत:कडील शिल्लक पैशातून वेतन अदा केले. त्यानंतर पालकांनी शुल्क न भरल्याने वेतन रखडले आहे.सध्या आॅनलाइन वर्ग सुरू आहेत, पण पालक पूर्ण शुल्क भरायला तयार नसल्याचे दायमा म्हणाले. खासगी शाळांसाठी हाच उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. तो बंद झाल्याने बँकांची कर्जे, स्कूलबसचे हप्ते थकले आहेत. सामान्यत: मार्चमध्ये परीक्षा होताच शुल्काचा शेवटचा हप्ता पालक भरतात. पण यंदा परीक्षा न झाल्याने हा हप्तादेखील थकला. अशा प्रकारे गेल्या वर्षीचे अंदाजे चाळीस टक्के शुल्क थकीत आहे. वेतन थांबल्याने शिक्षकांपुढेही बँकांच्या कर्जफेडीचा प्रश्न आहे.काही पालकांनी शुल्कामध्ये ५०% सूट मागितली आहे, पण ती देणे शक्य नसल्याची इसाची भूमिका आहे. जे उपक्रम घेतले नाहीत, त्यांचे शुल्क मात्र माफ करण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये संगणक, ग्रंथालय, क्रीडा, स्नेहसंमेलन, संगणक प्रशिक्षण आदींचा समावेश आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाTeacherशिक्षक