शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:31 IST

Exit Poll of Maharashtra 2024 : या पोल मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या पोलमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रातील एकूण 288 जागांसाठी आज (बुधवार) मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अर्थात बहुमतासाठी एकूण 145 जागा आवश्यक आहेत. तत्पूर्वी आता, राज्यात पार पडलेल्या मतदानानंतर, एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. यातच नुकताच 'इलेक्ट्रोल एज'चा पोल समोर आला आहे. यात  भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या पोलमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महायुतीला किती जागा मिळणार? -महाराष्ट्र विधानसभेसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर, 'इलेक्ट्रोल एज'चा हा पोल आला आहे. यात महायुतीतीलभाजपा 78 जागांसह सर्वात मोठा पक्ष अथवा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर येताना दिसत असला तर महायुतीला मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. महायुतीच्या हातातून राज्यातील सरकार जाताना दिसत आहे. महायुतीतील भाजपच्या 78 जागांशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) 26 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) 14 जागा, अशा एकूण 118 जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 145 जागांची आवश्यकता आहे. अर्थात या मॅजिक आकड्यापासून महायुतीला दूर राहताना दिसत आहे.

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? -'इलेक्ट्रोल एज'च्या पोलनुसार, काँग्रेस 60 जागांसह राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष तर महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. याशिवाय, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला 46 जागा तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागा मिळताना दिसत आहेत. अशा प्रकारे महाविकास आघाडीला एकूण 150 एवढ्या जागा मिळताना दिसत आहे अर्था महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करण्याचा अंदाज या एक्झिट पोप मधून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, इतरांना 20 जागा मिळण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे, हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे. राज्यातील चित्र असेल असेल असे नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आणि त्यानंतर झालेल्या हरियाणा विधानसभेच्या मतदानानंतर आलेले एक्झिट पोलचे आकडे पूर्णपणे आपटले होते अर्थात चुकीचे ठरले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv Senaशिवसेना