शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ई-टेंडरिंगला ग्रामविकासची बगल

By admin | Updated: March 24, 2015 01:34 IST

राज्यात सत्तेवर आल्यावर पारदर्शकतेकरिता ३ लाख रुपयांवरील सर्व कामांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.

मुंबई : राज्यात सत्तेवर आल्यावर पारदर्शकतेकरिता ३ लाख रुपयांवरील सर्व कामांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मात्र ग्रामविकास विभागाने २ लाख ९९ हजार रुपये किमतीची रस्त्यांची १९०० कामे आमदारांच्या शिफारशीवरून देताना ई-टेंडरिंगला बगल दिल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळला असला तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना लक्ष्य केले.अर्थसंकल्पावरील चर्चेला मुंडे यांच्या भाषणाने प्रारंभ झाला. ते म्हणाले की, राज्याचा हा अर्थसंकल्प नवसानं पोर व्हावं आणि मुके घेऊन मरावं, असा आहे. या अर्थसंकल्पात १९ कामांकरिता केलेली तरतूद चिन्हांकित दाखवल्याने लोकांनी या अर्थसंकल्पाला प्रश्नांकित केले तर नवल वाटू नये. १७५ कोटी रुपयांचे सावकारी कर्ज माफ केल्याचे व त्याचा २ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सरकार सांगत आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचे केवळ ७ हजार रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मागील सरकारने ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढल्याबद्दल भाजपाने आम्हाला लक्ष्य केले. मात्र या सरकारने गेल्या चार महिन्यांत ३३ हजार १०७ कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. या अर्थसंकल्पात विकासकामाकरिता ०.४५ टक्के तर विकासोत्तर कामाकरिता १५ टक्के रकमेची तरतूद केली आहे.मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी मतदारांनी भाजपाला सत्तेवर बसवले. मात्र एफएसआयवर अतिरिक्त प्रिमियम लावून याच भागातील घरे महाग करून भाजपाने या मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप मुंडे यांनी केला. बिल्डरांना अंकुश लावणाऱ्या व सरकारचे उत्पन्न वाढवणाऱ्या संजय पांडे यांची अवघ्या चार महिन्यांत बदली करून सरकारने उत्पन्न वाढीकरिता उपाय सुचवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्याच धोरणाला हरताळ फासला असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)कैद्यांना अमलीपदार्थमहाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांना अमलीपदार्थ दिले जातात, असा आरोप मुंडे यांनी केला. तसेच सिंघानिया या आंतरराष्ट्रीय बुकीला राज्यातील सरकारने संरक्षण दिले असून, पोलीस संरक्षणात फिरणारा हा बुकी अन्य बुकींवर धाडी टाकतोय, असा आरोपही मुंडे यांनी केला.