शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:08 IST

आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना साक्ष नोंदविण्यासाठी येण्यास २० मिनिटे उशीर झाला, यावर लांडेंनाच उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाल्याचे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरु झाला आहे. ठाकरे गटाची मॅरेथॉ़न सुनावणी, उलटतपासणी झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरु झाली आहे. यामध्ये आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना साक्ष नोंदविण्यासाठी येण्यास २० मिनिटे उशीर झाला, यावर लांडेंनाच उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाल्याचे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. यानंतर सुरु झालेल्या उलटतपासणीत लांडे यांनी अनेक प्रश्नांना आठवत नाही अशी उत्तरे दिली. 

सुनिल प्रभू यांनी व्हीप बजावलेला परंतू तो आपल्याला मिळाला नाही असे लांडे यांनी सांगितले. परंतू दुसरीकडे कामतांनी एक ईमेल आयडी दाखविताच तो आपलाच असल्याचे कबुलही केले. हा मेल आयडी मतपेढीचा असल्याचे लांडे यांनी सांगितले. या मेल आयडीवर दोन मेल प्रभूंकडून गेल्याचे विचारताच, लांडे यांनी भावाने आपल्याला सांगितले की जोशींच्या मेलवरून मेल आला होता, अशी कबुली लांडे यांनी दिली. 

य़ा मेलचा घटनाक्रम २ जुलै २०२२ चा आहे. तर ४ जुलैला भरत गोगावले यांनी जारी केलेला पक्षादेश कसा मिळाला, असे विचारले असता लांडे यांनी आपल्या हातात दिला गेला असे सांगितले. परंतू पोचपावती दिली का असे विचारले असता आठवत नसल्याचे उत्तर लांडे यांनी दिले आहे. 

22 जून ते 20 जून 2022 दरम्यान महाराष्ट्राबाहेर होतात का असे विचारले असता लांडे यांनी ही माझी खाजगी माहिती आहे, ती मी सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याना मुलाखती दिल्या का, त्यात उद्धव ठाकरेंसोबत असून शिंदेंना पाठिंबा देत नसल्याचे तुम्ही बोललेलात का असा सवाल विचारताच लांडे यांनी आठवत नाही असे उत्तर दिले. 

२१ जूनच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का? असा सवाल कामत यांनी केला असता लांडे यांनी आपल्याला व्हीप मिळाला नाही, गुलाबराव पाटील या व्यक्तीचा फोन आला होता, त्यावरून मी तिकडे गेलो होतो, असे सांगितले. तसेच तेथील अटेंडन्स शीटवर माझीच सही असल्याचे लांडे म्हणाले. 

सुनावणीनंतर लांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अपात्रतेबाबत न्यायालयामध्ये साक्ष चालू आहे. खरी माहिती न्यायालयासमोर ठेवत आहे. अनेक प्रश्न विचारले खरी माहिती द्यायची तरी काही अडचणीचे कारण नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे यांना दिला आहे, असे लांडे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना