शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत, रात्री गेले, पहाटे परतले, चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:27 IST

Devendra Fadnavis News: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नगर परिषदा, महानगरपालिका निवडणुकांमधील यशानंतर काल लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाने दणदणीय यश मिळवलं आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या काही तासांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपाला मोठा विजय मिळाल्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीच्या या दौऱ्यामध्ये फडणवीस यांनी भजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन .यांची भेट घेऊन  त्यांच्याशी चर्चा केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या विलिनीकरणाबाबत भाजपाची भूमिका काय असेल, याबाबतची रणनीती आखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह आणि नितीन नवीन यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis's sudden Delhi visit sparks speculation amid election victories and political shifts.

Web Summary : Devendra Fadnavis's sudden Delhi visit after local election wins fuels speculation. Discussions with Amit Shah and J.P. Nadda amidst NCP merger rumors suggest strategic realignment. Sunetra Pawar's planned Delhi trip adds to the anticipation of significant political developments in Maharashtra.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुतीdelhiदिल्ली