शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा निधीअभावी जाणार वाहून

By admin | Updated: June 13, 2015 02:23 IST

मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन

बिर्लागेट : मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी केली होती. यानंतर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठविला. मात्र, अद्याप निधी न मिळाल्याने तो यंदाच्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार, असे वाटते.मलंगगडावरून उगम पावणारी वालधुनी नदी एकेकाळी कल्याण तालुक्याची जीवनदायिनी ठरली होती. याच नदीवर इंग्रजांनी कल्याण स्थानकाला पाणीपुरवठा करणारा जीआयपी टँक बांधला होता. मात्र, काळानुरूप परिस्थिती बदलली. अंबरनाथमध्ये औद्योगिकीकरण झाले. नदीच्या काठांवर कारखाने झाले. त्यानंतर, उल्हासनगरातील जीन्स उद्योगांतून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याची भर पडली.प्लॅस्टिक घनकचरा जमा होऊन नदीचा नाला कधी झाला, हे कळलेच नाही. त्यातच काठांवरील अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ बनल्याने २००५ च्या अतिवृष्टीत सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराबाई रेणुका सोसायटी, शहाड फाटक आदी ठिकाणी झोपडपट्टीत पाणी घुसले होते. त्यामुळे या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या घोषणेनंतर आयुक्त सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून २०११ मध्ये सरकारकडे पाठविला. यावर सरकारने समितीही नेमली. या समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ बैठकाच होतात. निष्पन्न काहीच होत नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील २८ नद्यांच्या यादीत सगळ्यात जास्त प्रदूषित नदी वालधुनीच असल्याचे म्हटले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडून ९ हजार २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी काही निधी वालुधनी नदी विकासासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्यातरी हा विकास आराखडा निधीअभावी पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असेच दिसते. (वार्ताहर)