शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

“पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे”; पालकमंत्रीपद तिढ्यावर DCM एकनाथ शिंदे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:08 IST

Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून येऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Deputy CM Eknath Shinde News: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यांवरून महायुतीत चांगल्याच कुरबुरी झाल्याचे पाहायला मिळाले. नाराजीचे मानापमान नाट्य रंगले. आता पालकमंत्रीपदावरून महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोगावले समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे

पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला पदापेक्षा या महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. जो विकास आम्ही अडीच वर्षे केला, तो अधिक वेगवान गतीने करायचा आहे. आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्त्वाची आहे. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार, हे पाहणारे आम्ही लोक आहोत, असे सांगत कोट मंत्रि‍पदासाठी असतो, पालकमंत्रीपदासाठी नाही, असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून आले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी एक बैठक घेऊन पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खटके उडताना दिसत आहे. सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात फिरू न देण्याची भाषा शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहे. भरत गोगावले यांचे समर्थक या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती