शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Updated: March 21, 2015 01:21 IST

डोक्यावर दीड लाखाचे कर्ज... मेहनतीने शेतात कांदा लागवड केली... पीक चांगले आले; पण अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले.

आष्टी (जि. बीड) : डोक्यावर दीड लाखाचे कर्ज... मेहनतीने शेतात कांदा लागवड केली... पीक चांगले आले; पण अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे निराश झालेल्या पती- पत्नीने विषारी द्रव प्राशन केले. पतीचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ही हृद्रयद्रावक घटना वेताळवाडी येथे घडली.परमेश्वर संतराम काकडे (३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी वैशाली हिच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सात एकर शेती असून खरीप हंगामात पावसाअभावी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. बी- बियाणासाठी खासगी सावकाराकडून त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. रबीमध्ये त्यांनी तीन एकरवर कांदा लागवड केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. कांद्यांना चिरा पडल्या व नंतर तो सडला. कांदा हातचा गेल्याने कर्ज फेडायचे कसे, ही चिंता काकडे दाम्पत्याना सतावत होती. (वार्ताहर)