शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

लग्न जुळत नसल्याचा संताप, मुलाच्या हल्ल्यात पिता ठार, लाखांदूर तालुक्यातील अथली गावात घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:12 IST

Crime News: मोठा भाऊ बिनालग्नाचा. लहानाचे वय वाढलेले. तरीही वडिलांकडून लग्न लावून दिले जात नसल्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर वीट घातली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात घडली. शुक्रवारी (७नोव्हेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

लाखांदूर - मोठा भाऊ बिनालग्नाचा. लहानाचे वय वाढलेले. तरीही वडिलांकडून लग्न लावून दिले जात नसल्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर वीट घातली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात घडली. शुक्रवारी (७नोव्हेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पुरुषोत्तम कुंभलवार (५७) असे मृताचे तर, प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार (३३) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी रात्रीच त्याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी असलेल्या पुरुषोत्तमला दोन मुले आहेत. ते सर्व शेतकरी म्हणून काम करतात. शुक्रवारी, रात्री ८ वाजता घरी जेवण झाल्यानंतर पुरुषोत्तम, त्याची पत्नी रेवता (५१) आणि धाकटा मुलगा प्रदीप घरात गप्पा मारत बसले होते. मोठा मुलगा प्रेमकुमार (३५) बाहेर गेला होता. या दरम्यान, प्रदीपने वडिलांसोबत वाद घातला. तुम्ही म्हातारे झाला आहात, आम्ही अजूनही अविवाहित आहोत. लग्न कधी लावून देणार?, असे विचारल्यावरून वाद वाढला. रागाच्या भरात त्याने वडिलांच्या डोक्यावर विटेने वार केला. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले. रेवता कुंभलवार यांच्या तक्रारीवरून, लाखांदूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि प्रदीपला अटक केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Son Kills Father in Marriage Dispute in Lakhani Taluka

Web Summary : In Lakhani, a son fatally attacked his father with a brick after arguing about his delayed marriage. The father succumbed to his injuries. Police arrested the son on murder charges following the incident at their home.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र