शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकासातून राष्ट्र निर्माण

By admin | Updated: June 22, 2014 00:59 IST

सामूहिक योगदान आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय ठेवून परिवर्तन यात्रा सुरू केली असून सामाजिक उत्थान, शैक्षणिक विकास आणि आपदा प्रबंधन हे

प्रफुल्ल पारख यांचे वक्तव्य : भारतीय जैन संघटनेची परिवर्तन यात्रानागपूर : सामूहिक योगदान आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय ठेवून परिवर्तन यात्रा सुरू केली असून सामाजिक उत्थान, शैक्षणिक विकास आणि आपदा प्रबंधन हे कार्यक्षेत्र असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.‘नई पिढी-नई सोच’ घोषवाक्यभारतीय जैन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष पारख हे देशव्यापी दौऱ्यावर आहेत. सिव्हिल लाईन्स, उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘नई पिढी-नई सोच’ असे घोषवाक्य घेऊन त्यांची यात्रा सुरू आहे. पारख यांनी सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर एक नवीन पिढी तयार करण्याचे कार्य ‘बीजेएस’ करीत आहे. परिवर्तन यात्रा ३१ मार्च ते ७ सप्टेंबर २०१४ यादरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. महाराष्ट्रात २२ ते २९ जून असा कालावधी आहे. जवळपास २२५ सभा होणार आहेत. त्यासाठी एक हजार शिक्षण संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. एका वर्षात पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. सामाजिक उत्थानावर भरपरिवर्तनाच्या या युगात आपल्या पाल्याच्या प्रतिभांचे आकलन करून त्यांच्या शिक्षणासाठी चर्चा आणि समाधान तसेच विदेशी संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि आपल्या मुलीशी आपला व्यवहार, त्यांच्या अपेक्षा आमची चिंता, त्यांचे भविष्य आमच्या अपेक्षा, त्यांच्या स्वातंत्र्यावर चर्चा व समाधान हे मुद्दे परिवर्तन यात्रेत चर्चेत राहतील. विवाहाचे गंभीर प्रश्न, वाढते वय, विवाह जुळविण्याच्या जुन्या पद्धती, शिक्षणात वाढते अंतर, वाढत्या अपेक्षांमुळे आंतरजातीय विवाहावर चर्चा होणार आहे. पारख यांनी सांगितले की, आपण जुन्या कोर्सच्या माध्यमातून शिक्षक तयार करीत आहोत. सध्याच्या शिक्षण पद्धतीवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी आपल्याला शिक्षक तयार करावे लागेल, असे सूचक वक्तव्य केले आहे. विशेषत: पारंपरिक व्यवसायात नव्या पिढीची घटती रुची, जुन्या व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न, मॉल संस्कृतीचा प्रभाव, व्यवसायाच्या नवीन संधीकडे दुर्लक्ष, नवीन पिढीच्या कार्यक्षमतेचा पूर्ण उपयोग न होणे या गंभीर विषयावर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न परिवर्तन यात्रेत करण्यात येणार असल्याचे पारख यांनी सांगितले. पत्रपरिषदेत भारतीय जैन संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अतुल कोटेचा, सचिव रवींद्र आग्रेकर, पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष रमेश कोचर, सचिव विजय उदापूरकर यांच्यासह दिलीप रांका, प्रकाश मारवडकर, प्रशांत सवाने, डॉ. नरेंद्र भुसारी, दीपक शेंडेकर, अनिल पारख, दुर्वेश मोघे, मयूर दायमा, लोकेश बरडिया आणि सुनील गोलछा उपस्थित होते. (प्रतिनिधी)