शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: फळे-भाजीपाला वापरासंबंधी सफाई मार्गदर्शक तत्त्वे जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 04:28 IST

फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते.

नवी दिल्ली : बाजारातून भाजीपाला-फळे आणल्यानंतर लगेच न खाता त्यांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ करून खावी, ही बाब खरं तर कोरोना साथीआधीही लागू होतीच. मात्र, कोरोना महामारीत अन्नसेवन करताना सुरक्षेची काळजी व उपाययोजना करणे दैनंदिन जीवनात अनिवार्य झाले आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड आॅथॉरिटी आॅफ इंडियाने (फास्सी) फळे-भाजीपाला सफाई करताना काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्यांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे.फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते. त्यांना घरात आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यावर जिवाणू असल्यास फ्रीजमधील इतर खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका असतो. फळे-भाजीपाला भरपूर पाण्यात धुऊन घ्यावा. त्यासाठी पिण्यायोग्य पाणी वापरावे. शक्य झाल्यास क्लोरिनचे अल्प थेंब टाकून त्यांना काही मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावे. फळे-भाजीपाला साफ करताना कधीही साबण, निर्जंतुकीकरणाची रसायने, सफाईसाठीच्या द्रव्यांचा वापर करू नये. फळे-भाजीपाला इतस्तत: न ठेवता, त्यांना योग्य हवेशीरठिकाणी साठवणे.हे नियम पाळा...बाजारातून आल्यावर आपली पादत्राणे घराबाहेर ठेवणे.घरात आल्यानंतर कुठल्याही वस्तूंना हात लावू नये.घरी परतल्यानंतर २० सेकंदांपर्यंत हात व्यवस्थित धुऊन घ्यावेत.घराबाहेर जाताना वापरलेले कपडे घराबाहेर वेगळ्या बास्केटमध्ये जमा करावेत.बाहेरचे कपडे घरात वापरू नयेखाद्यपदार्थ पॅकमध्ये असताना त्यांच्यावर साबण किंवा अल्कोहोलयुक्त द्रव फवारून त्याचे निर्जंतुकीकरण करावे. जेथे शक्य आहे, तेथे पाणीही वापरावे.सिंक अथवा पृष्ठभाग साफ करून घ्यावा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्नHealthआरोग्य