शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:01 AM

Rajeev Satav : सातव यांच्या निधनानंतर नाना पटोलेंनी व्यक्त केलं दु:ख

ठळक मुद्देही कधीही भरुन न निघणारी हानी असल्याचं म्हणत पटोले यांनी व्यक्त केलं दु:खआज पहाटे सातव यांचं झालं निधन

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. दरम्यान, यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या."आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त!," असं म्हणत सातव यांच्या निधनानंतर नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते. असं असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंत, रविवारी पहाटे त्यांचं निधन झालं. काँग्रसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिलं आहे. मनाला वेदना देणारी बातमी : अशोक चव्हाण"काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याची वार्ता आज सकाळीच सर्वांना कळाली. अतिशय धक्कादायक आणि निराश करणारी ही बातमी आज आलेली आहे. अतिशय वेदना देणारी आणि मनाला न पटणारी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे राजीव सातव धडाडीचे नेते होते. अतिशय अल्प काळामध्ये त्यांनी जिल्ह्यापासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या कर्तुत्वाने त्या ठिकाणी आपली उंची वाढवली. काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा असा हा सहकारी आज आमच्यामधून गेल्याची खंत आम्हा सर्वांना आहे," असं म्हणत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केलं. 

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत