शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

‘काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही’, काँग्रेसचं भाजपाला प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:10 IST

Congress Criticize BJP : काँग्रेसला प्रत्युत्तर देताना भाजपाने काँग्रेसच्या सत्ताकाळातील काही निर्णयांचे फोटो आणि वृत्तपत्रातील कात्रणे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर जोरदार पलटवार केला आहे.

आखातातील तणावामुळे भडकलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत असलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी देशवासियांनी वर्षभर सोन्याची खरेदी करू नये, तसेच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, असं आवाहन केलं होतं. त्यावरून काँग्रेसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपानेकाँग्रेसच्या सत्ताकाळातील काही निर्णयांचे फोटो आणि वृत्तपत्रातील कात्रणे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. 

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपची ‘लाचार’ आयटी सेल आपल्या मालकाची उडालेली लक्तरं सावरण्यासाठी आता जीवाचं रान करत आहे. स्वतःचा नाचक्की लपवण्यासाठी फेक न्यूज आणि वृत्तपत्रांची बनावट कात्रणं छापण्याचा कारखानाच त्यांनी उघडला आहे. “इंदिराजींनी सोनं खरेदीला बंदी घातली होती” किंवा “मनमोहन सिंगांनी इंधन रोखलं होतं”... अशा बाळबोध आणि निर्लज्ज पुड्या आता त्यांच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या गटारातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सावध राहा,  हा तोच राजा आहे जो अमेरिकेसमोर झुकला, त्यांच्या तालावर नाचला आणि आता स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी भारतीय जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. या भ्रमीष्ट टोळीच्या थापांना बळी पडू नका.

काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वाने देशाला नेहमीच दिशा दिली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा काँग्रेसने ढाल बनून जनतेचं रक्षण केलं. त्यांनी जबाबदारी झटकून पळ काढला नाही किंवा संकटाच्या काळात इव्हेंटबाजी केली नाही! काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Slams BJP: History of Struggle, Duty, Not Cowardice

Web Summary : Congress retorted to BJP's criticism regarding economic measures, asserting its history is of struggle and duty, not cowardice. They accused BJP's IT cell of spreading misinformation and misleading the public, highlighting Congress's commitment to protecting the nation during crises.
टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी