शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवर आधारित पुस्तक लवकरच भेटीला : डॉ. अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:25 IST

इतिहास एका स्वप्नपूर्तीचा ' स्वराज्यरक्षक संभाजी' असे या पुस्तकाचे शीर्षक असणार

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत सुरु केले मालिका निर्मितीविषयी लेखन

सचिन कांकरिया - नारायणगाव : प्रशासकीय पातळीवर दररोज कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा.  शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे व्हाट्सअप , फेसबुक वर आलेले मेसेज , तक्रारी व अन्य समस्याचे निवारण करायचे.  उर्वरित वेळ पत्नी डॉ. आश्विनी , मुलगी अद्या , मुलगा रुद्र यांना देत डॉ. कोल्हे एक पुस्तक लिहित आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास उलगडणारे हे पुस्तक आहे.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आहेत. मात्र, तरीही त्यांचा  दिनक्रम व्यस्त आहे.  रोज सकाळी त्यांचे तीन महत्त्वाचे अपडेट असतात.  पहिला कॉल जिल्हाधिकारी नवल किशोर राम , नंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि तिसरा कॉल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा असतो.  या तीन प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोरोना बद्दल अपडेट घेऊन शिरूर मतदारसंघातील परिस्थिती काय आहे ? हे जाणून घेतात.  यानंतर मतदारसंघातून आलेले मेसेज कॉल , व्हाट्सअप , फेसबुक वरील सूचना तक्रारीची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी  बोलतात.  स्वत: डॉक्टर असल्याने कोरोनासंदर्भात नागरिकांच्या शंकांचे निरसनही ते करतात. सध्याच्या घडामोडी असेल असा दररोज एक व्हिडिओ आज पासून यूट्यूब व फेसबुक द्वारे नागरिकां पर्यंत पाठविण्याचा त्यांचा मानस असल्याने डॉ. कोल्हे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. कोल्हे यांचा दिनक्रम व्यस्त होता. संभाजी महाराज वरील मालिका , चित्रपट नंतर लोकसभा निवडणूक या सर्व व्यस्त कालावधीमध्ये गेल्या ५ ते ६ वर्षात त्यांना त्यांच्या कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही .  आता घरात असताना बराच वेळ ते त्यांची पत्नी डॉ. आश्विनी , मुलगी अद्या , मुलगा रुद्र यांच्या सोबत घालवितात .  अद्या , रुद्र यांच्या सोबत खूप धमालमस्ती करीत आहेत

इतिहास एका स्वप्नपूर्तीचा - ' स्वराज्यरक्षक संभाजी' पुस्तकाचे लेखन....

दिवसभरातील काही वेळ स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा प्रवास उलगडून दाखवणारे पुस्तक डॉ. अमोल कोल्हे लिहित आहेत. या पुस्तकामध्ये मालिकेसाठी आलेल्या अडचणींसोबतच डॉ. कोल्हे यांनी केलेला संभाजी महाराजांचा अभ्यासही  असेल. त्याचबरोबर सेटवरील गमती-जमती असतील. त्याचबरोबर इतिहासातील काळ उभा करण्यासाठी अनेकांनी केलेली मदतीचाही उल्लेख असेल.

टॅग्स :narayangaonनारायणगावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSwarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTelevisionटेलिव्हिजन