शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:47 IST

BCC News: पाच वर्षांपूर्वीची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची चित्रफीत संपादित करून प्रेक्षकांनी दिशाभूल केल्याप्रकरणी बीबीसी या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संचालक टिम डेव्ही व वृत्तप्रमुख डेबराह टर्नेस यांना  आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

लंडन - पाच वर्षांपूर्वीची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची चित्रफीत संपादित करून प्रेक्षकांनी दिशाभूल केल्याप्रकरणी बीबीसी या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संचालक टिम डेव्ही व वृत्तप्रमुख डेबराह टर्नेस यांना  आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. जानेवारी २०२१मध्ये कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. त्यावेळी ट्रम्प यांचे भाषण अशा प्रकारे संपादित केले, की ज्यात ट्रम्प आपल्या समर्थकांना दंगल घडवण्यास उद्युक्त करत असल्याचे वाटत होते.

ट्रम्प नेमके काय म्हणाले ?कॅपिटलहिल येथील भाषणात ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना ‘आपण सर्वजण कॅपिटलपर्यंत जाऊया. तेथे आपल्या धाडसी सिनेटर व काँग्रेस सदस्यांचा उत्साह वाढवूया,’ असे आवाहन केले होते.पण बीबीसीच्या पॅनोरामा या शोमध्ये, ‘आपण सर्वजण कॅपिटलपर्यंत जाऊया... आणि मीही तुमच्याबरोबर असेन. आपण पुऱ्या ताकदीनिशी लढूया,’ असे ट्रम्प समर्थकांना आवाहन करत होते.वास्तविक ट्रम्प यांनी ५० मिनिटांच्या अंतरात दोन वेगवेगळी भाषणे केली होती आणि बीबीसीने या दोन भाषणांमधील ट्रम्प वेगवेगळी वक्तव्ये जोडली होती. त्यामुळे ट्रम्प दंगल घडवत असल्याची प्रेक्षकांची दिशाभूल होत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : BBC chiefs resign over Trump video editing, misleading viewers.

Web Summary : BBC heads resigned after a Trump video was deceptively edited. The altered video made it appear Trump incited Capitol riots, misleading viewers about his actual words and intent during the speech.
टॅग्स :Journalistपत्रकारMediaमाध्यमेInternationalआंतरराष्ट्रीयDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प