मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:15 IST2025-09-17T20:15:01+5:302025-09-17T20:15:44+5:30

CM Devendra Fadnavis: हा प्रकार समजताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

cm devendra fadnavis first reaction over desecration of late meenatai balasaheb thackeray statue in dadar | मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Devendra Fadnavis: दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. अज्ञातांनी या पुतळ्यावर लाल रंग फेकला, सकाळी ही गोष्ट शिवसैनिकांच्या निदर्शनास येताच एकच गर्दी झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

हा प्रकार निंदनीय आहे. ज्याला स्वत:च्या आई वडिलांची लाज वाटते, अशा नराधमाने, बेवारस व्यक्तीने ही गोष्ट केली असावी किंवा बिहारमध्ये ज्या प्रकारे मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसा महाराष्ट्र पेटवण्याचे काम कुणी करत असेल. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

राजकीय रंग देणे, योग्य वाटत नाही

स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अशा प्रकारची घटना निषेधार्हच आहे. ज्या कोणत्या समाजकंटकाने ही घटना केली आहे, त्याला पोलीस शोधून काढतील. त्याच्यावर कारवाई केली जाईल. यापेक्षा याला जास्त राजकीय रंग देणे, हे मला योग्य वाटत नाही. 

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट दिली. तिथे संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी परिसरातील सगळे सीसीटीव्ही चेक करा, २४ तासांत या आरोपीला शोधून काढा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

 

Web Title: cm devendra fadnavis first reaction over desecration of late meenatai balasaheb thackeray statue in dadar