शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सवंग लोकप्रियतेसाठी तिजोरीची तूट

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

सर्वसामान्य जनतेला ज्या मुद्द्याची सर्वाधिक झळ बसते त्या महागाईच्या मुद्द्यापासून आपण वेध घेऊ. महागाईविरोधात लोकांनी मतदान केल्याचे बोलले जात होते

सर्वसामान्य जनतेला ज्या मुद्द्याची सर्वाधिक झळ बसते त्या महागाईच्या मुद्द्यापासून आपण वेध घेऊ. महागाईविरोधात लोकांनी मतदान केल्याचे बोलले जात होते, पण आता तीच महागाई लोकांच्या डोक्यावर येऊन बसली आहे. एक-दोन नव्हे, तर सरसकट सगळ्याच वस्तूंची भाववाढ झालेली दिसते. याचे कोणतेही ठोस उत्तर राज्य आणि केंद्र या दोघांकडे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल १४० अमेरिकी डॉलर इतक्या होत्या, त्यावरून आता हे दर घसरून प्रति बॅरल ४० अमेरिकी डॉलर इतके खाली आहेत. त्यामुळे महागाई राहण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशात डाळींचे दर वाढले आहेत. त्याकडे लक्ष देतानाच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले असते तर आज डाळ आयात करायची वेळ आली नसती. शेतकऱ्याला मदत न करता परदेशातून अव्वाच्या सव्वा दराने डाळ आयात करायची ही परदेशातील शेतकऱ्यालाच मदत करायची या सरकारची नीती दिसते. एलबीटी आणि टोल माफीचे निर्णय अतार्किक वाटतात. टोल माफीचा निर्णय लोकप्रिय जरी असला तरी वस्तुस्थितीचा विचार केला तर या निर्णयामुळे आगामी तीन वर्षांत रस्त्यांचा दर्जा घसरताना दिसेल. एकीकडे रस्त्यांची देखभाल करणे कठीण होणार आहे तर दुसरीकडे टोल माफी केल्यामुळे रस्त्यांच्या बांधणीनंतर त्याकरिता संबंधित कंपन्यांना काही हजार कोटी रुपये सरकारला तिजोरीतून द्यावे लागतील, त्याचा ताणही सरकारी तिजोरीवरच पडणार आहे. तर दुसरीकडे एलबीटी माफ केला असला तरी, बुडालेल्या महसुलाची जोडणी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी करातून मिळणारा पैसा जर तिथे वळविला जाणार असेल तर अनेक नव्या उपाययोजनांना निधीअभावी मुकावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी अर्थसंकल्पात वित्तीय तूट १० ते १२ हजार कोटींवर जाईल व आर्थिक डोलारा सांभाळताना अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. नव्या उद्योगांची निर्मिती, रोजगारनिर्मिती व उद्योगाचा विकास याकरिता सरकार गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही. उत्पन्नाचे पंख स्वत:च छाटून टाकले आहेतअर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात साडे तीन हजार कोटी रुपयांची तूट आहे. त्यात आता टोल माफी आणि एलबीटी (स्थानिक स्वराज्य संस्था कर) रद्द करून महसुली उत्पन्नाचे पंख स्वत:च छाटून टाकले आहेत. आधीची वित्तीय तूट आणि या महसुली उत्पन्नातील कपातीमुळे पुढच्या अर्थसंकल्पात हीच तूट ८ हजार कोटी रुपयांवर पोहोचलेली दिसेल. या तुलनेत नवीन महसुली उत्पन्न निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून मागच्या सरकारने काही शिल्लक ठेवले नाही अशी हाकाटी पिटली जाते. पण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. १९९९ साली मी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्या वेळी राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हा सकल उत्पन्नाच्या २६ टक्के इतका झाला होता. कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरले आणि राज्याची स्थिती मजबूत करत आम्ही प्रयत्नपूर्वक कर्जाचे हेच प्रमाण सतरा ते साडे सतरा टक्के इतके खाली आणले. याचा अर्थ राज्य सरकारची वित्तीय स्थिती पूर्ण आटोक्यात आहे.