मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली २०० गुणांची परीक्षा, महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल, नितेश राणे यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:12 IST2026-01-26T15:09:12+5:302026-01-26T15:12:42+5:30
Maharashtra Government: प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली २०० गुणांची परीक्षा, महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल, नितेश राणे यांनी केलं कौतुक
प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली असून, नितेश राणे यांच्या मंत्रालयाच्या अधिन असलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळाने २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळातील कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला "१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम" हा डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था/मंडळे व कंपन्यापैकी महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) या मंडळाने सामान्यीकृत २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला "१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम" हा डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय… pic.twitter.com/5sdpQzOXJq
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 26, 2026
सागरी मंडळ(MMB) या मंडळाने सामान्यीकृत (राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये) २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) या मंडळातील आणि बंदरे विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन, अशा शब्दात नितेश राणे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.