शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

Chhagan Bhujbal: शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण...; छगन भुजबळ मनातलं बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 12:40 IST

राष्ट्रवादी काँग्रेसनं मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत  ज्यांना कोणी विचारत नाही असं ते म्हणाले.

नाशिक – दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thaackeray) यांना नैराश्य आले आहे. त्यांना केवळ मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते पण स्वत: झाले. इतर नेत्यांना बाहेर का पडावं लागलं? असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले.

आता देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर छगन भुजबळांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. भुजबळ म्हणाले की, मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो. मी शिवसेना(Shivsena) सोडल्यावर स्वतः बाळासाहेब सुद्धा हे म्हणायचे. मात्र मला त्याची खंत नाही. ओबीसींच्या(OBC) कारणामुळे मी शिवसेना सोडली. मला काँग्रेससह इतर पक्षांचंही आमंत्रण होतं, आमच्याकडे या मुख्यमंत्री करतो असंही त्यांनी सांगितलं.

परंतु मी पवार साहेबांची साथ पकडली. राष्ट्रवादी काँग्रेसनं मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत  ज्यांना कोणी विचारत नाही. परंतु लोकांचं मला भरपूर प्रेम मिळतं. फडणवीस यांच्यात भ्रष्टाचार आरोप असलेला गुण हा उद्धव ठाकरे यांच्यात नाही.  फडणवीस हे क्लीन चिट मास्टर आहेत. हा अवगुण आहे असं मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलू शकत नाही असा उपरोधिक टोला भुजबळांनी फडणवीसांना लगावला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत. आता मुखवटा काढा आणि मान्य करा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते, देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही. जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं.

आणखी वाचा

...मग राज ठाकरेंना बाहेर का पडावं लागलं; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस