शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सव्वासहा कोटींची रोकड जप्त; पालघर, कसाऱ्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:33 IST

बुधवारी तलासरीत सव्वाचार कोटी तर कसाऱ्यात दोन कोटी रुपये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

नवी मुंबई/कल्याण/तलासरी/कसारा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सध्या पोलिस आणि निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून खासगी वाहनांची तपासणी केली जात आहे. बुधवारी तलासरीत सव्वाचार कोटी तर कसाऱ्यात दोन कोटी रुपये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

तलासरी तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रात उधवामार्गे प्रवेश करणाऱ्या एका गाडीची झडती घेतली असता त्यांना त्यात ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड आढळली. ही रोकड एटीएममध्ये जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे वाहनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, ही रोकड गुजरात राज्यातील एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात असताना ती महाराष्ट्राच्या हद्दीत का आणण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलासरी पोलिसांनी रोकडसह वाहन ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामणवाडी पोलिस चौकीजवळ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जात असलेल्या एका गाडीत दोन कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. कसारा घाटाच्या पायथ्याशी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी केली जात होती. कारमध्ये संशयास्पद रक्कम सापडल्याने पोलिसांनी ताब्यात घेत वाहन जप्त केले.  

बोईसरमध्ये चार लाख  बोईसरमध्ये वसई फाटा येथील तपासणी  नाक्यावर सोमवारी चार लाखांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक भरारी पथकाने ही कारवाई केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.  

पैसा पारेख भाईचा रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कारमधील दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता हे पैसे पारेख भाईचे आहेत, असे सांगितले. निवडणूक सहायक अधिकारी (खर्च) प्रमोद बच्छाव, नोडल अधिकारी नम्रता जगताप यांच्या उपस्थितीत ही रक्कम मोजण्यात आली. सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत कारवाई सुरू होती.

नवी मुंबईत ८६ लाख, कल्याणमध्ये आठ लाख   सीवूडमध्ये बुधवारी ८६ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई कृष्णा हॉटेलसमोरील रोडवर पार्किंगमध्ये करण्यात आली आहे. तर कल्याणमध्ये दुर्गाडी चौकात दुचाकीस्वार तरुणाकडून आठ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024