शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: February 20, 2017 20:21 IST

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आचारसंहिता काल दुपारी पाच वाजता संपली असतानाही छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय, हा सरकारी अधिकारांचा गैरवापर आहे, मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघनच आहे. त्यामुळे फडणवीसांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

(मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

 

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत आहेत, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्याना राजकारणातली ही पारदर्शकता दिसत नाही का?  मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर सर्वाना परवानगी मिळायला हवी. दिवसभर सुरु असलेल्या मुलाखती या पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशय आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्याना कोणी रोखलेले नाही. भारतीय जवानाबद्दल अशब्द काढणाऱ्या प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असती तर आम्हाला आनंद वाटला असता, परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. 

प्रचाराची वेळ संपल्यानंतर कोणीही प्रचार करू नये असा नियम आहे. मात्र, वेळ संपल्यांनंतरही मुख्यमंत्र्यानी मुलाखती दिल्या आहेत, हा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, आम्ही निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली आहे असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. 

(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)

 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाने वेगळ लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाल्या.