शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा हात सेनेने झिडकारला!

By admin | Updated: October 7, 2014 05:58 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मी शिवसेनेवर टीका करणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मी शिवसेनेवर टीका करणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून जोरदार प्रत्युत्तर देत भाजपाचा डाव उधळून लावला आहे.महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न घेऊन भाजपावाले निवडणुकीत उतरले असून, शेठ-सावकारांचा सट्टाबाजारातील पैसा या स्वप्नपूर्तीसाठी वापरला जात आहे. त्यांचे स्वप्न महाराष्ट्राची शकले करण्याचे असताना या लोकांना शिवछत्रपतींचे आशीर्वाद लाभतील, असे ओरडून सांगणे हा हुतात्म्यांचा अवमान आहे. मोरारजी देसाई जे करायला धजावले नाहीत ते सर्व करण्याचा चंग भाजपा नेतृत्वाने बांधला आहे, अशी थेट टीका शिवसेनेने मुखपत्रातून मोदी यांच्यावर केली आहे.शिवसेनाप्रमुखांनी गेली २५ वर्षे अभेद्य ठेवलेली युती या वेळीच कशी तुटली? केवळ जागावाटपावरून युती तुटत असताना शिवसेनाप्रमुखांबद्दलचा आदरभाव कुठे गेला होता? हा वाद ताणून न धरता युती अभेद्य ठेवली असती तर तीच शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली ठरली असती. तेव्हा आता श्रद्धांजली वगैरे म्हणणे म्हणजे ‘बूंद से गयी’ असे मराठी मनात आले तर? भाजपाच्या उत्सव मंडळाने एक लक्षात घेतले पाहिजे की, तुमच्याकडे शेठ-सावकारांचे बळ असेल, कारस्थाने व कटांचे बुद्धिबळ असेल, पाठीत खुपसण्यासाठी खंजीर असतील, पण शिवरायांचे आशीर्वाद इतके स्वस्त नाहीत. शिवाजी महाराज म्हणजे चालता बोलता पुरुषार्थ. हा पुरुषार्थ कुठून आणाल, असा हल्ला शिवसेनेने मुखपत्रातून भाजपावर केला. (विशेष प्रतिनिधी)