शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते सुधीर मुनंगटीवार कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 20:38 IST

आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सुधीर मुनगंटिवार यांनी स्वतःच ट्विट करून सांगितले आहे. माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई - राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली. "माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी, कोरोना टेस्ट करावी आणि क्वारंटाईन व्हावे, अशी मी विनंती करतो," असे मुनगंटीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना संकटामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशनही दोन दिवसांतच आटोपते घेण्यात आले होते. मात्र, या अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाचा धोका वाढला आहे. सुधीर मुनगंटीवारांपूर्वी, आजच अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याशिवाय त्यांची पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर १२ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ -देशात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवे 23501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 857933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 297480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22 टक्के झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.

कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणि उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कोरोना अहवालही शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन 

धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस