धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:18 PM2020-09-19T13:18:54+5:302020-09-19T13:22:56+5:30

या संशोधनात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. यात भारतात समार्टफोनचा वापर करणाऱ्या तब्बल 62 टक्के महिला सेक्सटिंगचा अथवा सेक्स टेक्सटिंगचा वापर करतात.

62 Percent Indian women engage in sexting on smartphone apps | धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात तब्बल 19 टक्के महिला अ‍ॅप्सचा वापर डेटिंग पार्टनर्स शोधण्यासाठी करतात. भारतात समार्टफोनचा वापर करणाऱ्या तब्बल 62 टक्के महिला सेक्सटिंगचा अथवा सेक्स टेक्सटिंगचा वापर करतात.या संशोधनात 191 देशांच्या महिलांनी भाग घेतला होता. यात एकूण 1,30, 885 महिलांचा समावेश होता. यांपैकी 23,093 महिला या भारतातील होत्या.

नवी दिल्ली - सध्या स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आज जवळपास प्रत्येकाच्याच हतात स्मार्टफोन दिसतो. परिणामी सोशल अ‍ॅप्सचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र आता या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. भारतात तब्बल 19 टक्के महिला अ‍ॅप्सचा वापर डेटिंग पार्टनर्स शोधण्यासाठी करत आहेत. यादरम्यान त्या दीर्घ काळासाठी अथवा शॉर्ट टर्म रिलेशनशीपसाठी पार्टनर शोधतात. जगाचा विचार करता हा दर 21 टक्के एवढा आहे.

या संशोधनात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. यात भारतात समार्टफोनचा वापर करणाऱ्या तब्बल 62 टक्के महिला सेक्सटिंगचा अथवा सेक्स टेक्सटिंगचा वापर करतात. म्हणजे, त्या सेक्सी फोटोज अथवा मेसेजस आपल्या मोबाईलवरून दुसऱ्याला पाठवतात. रुचिका उनियाल यांच्या रिपोर्टवरून ही गोष्ट समोर आली आहे.

ऑन लाईप प्रश्नाच्या आधारे संशोधन -
हे संशोधन जर्नल प्लोस वनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात 191 देशांच्या महिलांनी भाग घेतला होता. यात एकूण 1,30, 885 महिलांचा समावेश होता. यांपैकी 23,093 महिला या भारतातील होत्या. या संशोधनात महिलांनी ऑनलाईन प्रश्नांची ऑनलाईनच उत्तरे दिली. 

सेक्सटिंग करणाऱ्या महिलांचे प्रमाण चौपट -
या सर्वेक्षणादरम्यान महिलांनी दिलेल्या उत्तरांचा अभ्यास केल्यानंतर, ज्या देशांत महिलांसोबत लैगिक असमानतेचे प्रमाण अधिक आहे. अशा देशांत सेक्स पार्टनरचा  शोध घेण्यासाठी मोबाईलचा वापर कमी प्रमाणावर होतो. मात्र, या देशांतील महिला मोठ्या प्रमाणावर सेक्सटिंग करतात आणि हे प्रमाण जवळपास चार पट अधिक आहे. 

21 ते 24 वर्षांच्या आतील महिला करतात अ‍ॅप्सचा सर्वाधिक वापर -
या संशोधनातील आकडेवारीचा विचार करता 4,362 म्हणजे जवळपास 19 टक्के महिलांनी मान्य केले आहे, की त्या पार्टनर शोधण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करतात. यात 18 ते 54  वर्षांच्या महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वयोगटात डेटिंग अ‍ॅपचा वापर करणाऱ्या महिलांत 21 ते 24 वर्षांच्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, ज्या महिला पार्टनर शोधतात, त्यांपैकी 29 टक्के महिलांनी सांगितले, की त्या केवळ एन्जॉयमेंटसाठी पार्टनर शोधतात.

महत्त्वाच्या बातम्या -

रशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस

आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक

SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

Web Title: 62 Percent Indian women engage in sexting on smartphone apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.