State bank of india otp based cash withdrawal 10000 rs and above throughout the day across all its atms effective from 18 september | SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा

SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा

ठळक मुद्देएसबीआयने एटीएममधून 10,000 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक पैसे काढण्यासाठी ओटीपी बेसड कॅश विथड्रॉल सुविधेची कक्षा वाढवली आहे.ओटीपी बेसड कॅश विथड्ऱॉलची सुविधा सध्या केवळ एसबीआय एटीएमवरच उपलब्ध आहे.बँकेच्या या ओटीपी बेसड सुविधेमुळे ग्राहकांची फसवणूक टळेल.

नवी दिल्ली - आपण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे  (एसबीआई) ग्राहक असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. कारण, आज 18 सप्टेंबरपासून एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत बदलली आहे. एसबीआयने एटीएममधून 10,000 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक पैसे काढण्यासाठी ओटीपी बेसड कॅश विथड्रॉल सुविधेची कक्षा वाढवली आहे. बँकेची ही सुविधा 18 सप्टेंबरपासून 24 तासांसाठी सुरू राहणार आहे.
 
एसबीआयने या वर्षीच जानेवारी महिन्यात 10,000 रुपये आणि त्याहून अधिकच्या एटीएमवरील व्यवहारासाठी ओटीपी बेसड कॅश विथड्रॉल सुविधा रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू केली होती. एसबीआय ग्राहकांना 10,000 रुपये अथवा त्याहून अधिक पैसे काढण्यासाठी आपला एटीएम कार्ड पीन आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येणारा ओटीपीही टाकावा लागणार आहे. हीच प्रोसेस त्यांना प्रत्येक विथड्रॉलच्या वेळी करावी लागेल.
 
या सुविधेमुळे टळेल ग्राहकांची फसवणूक - 
बँकेच्या या ओटीपी बेसड सुविधेमुळे ग्राहकांची फसवणूक टळेल. याच बरोबर एसबीआयने आपल्या सर्व ग्राहकांना मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड अथवा अपडेट करायला सांगितला आहे. थोडक्यात आपले अकाउंट सुरक्षित रहावे, असे आपल्याला वाटत असेल तर आपण हे रजिस्ट्रेशन करायला हवे. ओटीपी बेसड कॅश विथड्ऱॉलची सुविधा सध्या केवळ एसबीआय एटीएमवरच उपलब्ध आहे. इतर बँकाच्या एटिएमवर ही सुविधा सुरू करण्यात आलेली नाही.

वर्ष अखेरीस ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू होणार -
SBIने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. मे महिन्यात बँकेने एसबीआय व्हेकर वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजनेची घोषणा केली. सध्या घसरत जाणारे व्याजदर पाहता ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली. वर्षाच्या अखेरीस ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना उपलब्ध होईल. तत्पूर्वी बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत ही योजना वैध असल्याचे जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या -

भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...!

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

English summary :
State bank of india otp based cash withdrawal 10000 rs and above throughout the day across all its atms effective from 18 september.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: State bank of india otp based cash withdrawal 10000 rs and above throughout the day across all its atms effective from 18 september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.