शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

OBC Reservation : मुख्यमंत्री हतबल झालेत की प्रस्थापितांपुढे नांगी टाकली हे त्यांनी सांगावं - गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:19 PM

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट. भेटीनंतर ओबीसी आरक्षणावर स्पष्ट केली भूमिका.

ठळक मुद्देभाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट.भेटीनंतर ओबीसी आरक्षणावर स्पष्ट केली भूमिका.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. या प्रस्थापितांच्या सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाही हे राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होत असल्याचं ते म्हणाले.

"माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा जो मूळ प्रस्ताव आहे यात विधी व न्याय खात्यानं स्पष्टपणे नमूद केलंय की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. या सर्व खात्यांचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना हेच विचारायचं आहे की त्यांना त्यांच्या शासनामध्ये काय घडतंय याचा सुगावा नसतो का? या सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधायला त्यांना वेळ नसतो का? किरीट सोमय्यांना अटक केली हेदेखील त्यांना माहित नसतं," असं पडळकर म्हणाले. "समस्त ओबीसींचा जो विषय आहे तो राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढला यातही त्रुटी आहेत हेदेखील यांना माहित नसतं. यांच्याच विभागानं यात नकारात्मक भूमिका घेतली. यावर कोणताही उपाय न करता त्यांनी राज्यपालांकडे प्रस्ताव कशासाठी पाठवला? मुख्यमंत्री हतबल आहेत की प्रस्थापितांच्यापुढे त्यांनी नांगी टाकलीये हे त्यांनी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांना सांगावं अशी मी विनंती करत आहे," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्रीOBC Reservationओबीसी आरक्षणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी