शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाची वादळी सुरुवात!

By admin | Updated: March 10, 2015 04:31 IST

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्या फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या गाडीला घेराव घातला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सोमवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल विधान भवन परिसरात दाखल होताच विरोधीपक्षाच्या आमदारांनी त्यांना सरकारच्या निषेधाचे फलक दाखविले. अभिभाषण सुरू असताना, ‘कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा धिक्कार असो’, ‘नुकसानभरपाई न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उभे राहून मागे गोंधळ घालणाऱ्या आमदारांची नावे लिहून घेत असल्याचे हावभाव करू लागले तेव्हा विरोधकांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)