‘आप वही हो ना?’ म्हणत अयान हेरायचा सावज! असा ओढायचा जाळ्यात, व्हिडीओकांड प्रकरणाचा असा झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:05 IST2026-04-18T11:04:36+5:302026-04-18T11:05:07+5:30
Paratwada Crime News : मेळघाटातील बी. एस्सी.चा विद्यार्थी ते डझनावर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा परतवाडा ‘व्हिडीओ कांड’चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे.

‘आप वही हो ना?’ म्हणत अयान हेरायचा सावज! असा ओढायचा जाळ्यात, व्हिडीओकांड प्रकरणाचा असा झाला पर्दाफाश
- प्रदीप भाकरे
अमरावती - मेळघाटातील बी. एस्सी.चा विद्यार्थी ते डझनावर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा परतवाडा ‘व्हिडीओ कांड’चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे.
वही हो ना?’ या एका साध्या वाक्यातून संवादाची जाळी विणून मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारा अयान अहमद सध्या पोलिस कोठडीत असून, त्याने दिलेली कबुली ऐकून एसआयटी चक्रावून गेली आहे. एका कथित ‘गुरू’ने दिलेल्या ‘गुरुमंत्रा’चा वापर करून त्याने डझनावारी मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. अयान केवळ सोशल मीडियावर ‘हाय-हॅलो’ करण्यावर विश्वास ठेवत नव्हता. चौकशीत त्याने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी एका तरुण गुरूने त्याला संवादाचे कौशल्य शिकवले होते. ‘आप वही हो ना? अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नाने तो संवादाची सुरुवात करायचा. समोरची मुलगी ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर न देता सविस्तर बोलायची आणि येथूनच अयानच्या जाळ्यात अडकण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. इन्स्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्स असलेल्या या नराधमाने सोशल मीडियाचा वापर ‘हंटिंग ग्राउंड’सारखा केला.
कठोरा नाक्यावरचा फ्लॅट सात ते आठ वेळा वापरला
अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका टू-बीएचके फ्लॅटमध्ये अयानने काही मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. अटक आरोपी मानव सुगंधे याने अयानला ५०० रुपये प्रतितास या दराने हा फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. शेजाऱ्यांना या फ्लॅटमधील संशयास्पद हालचालींची माहिती होती. मात्र, फ्लॅट मालकाच्या उद्दामपणामुळे कुणीही तक्रार करण्याचे धाडस केले नाही. आता फ्लॅटमालक पोलिसांच्या रडारवर आहे.
परतवाड्याच्या एपीआयसह तीन पोलिस निलंबित
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये परतवाड्याचे काही पोलिस मुख्य आरोपी अयान अहमद याचा वाढदिवस साजरा करताना दिसून येत होते.
या बाबीचा गुन्ह्याच्या तपासावर प्रभाव पडू नये, यासाठी परतवाडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सलीम शेख व अंमलदार मयुर गुरव तथा शुभम शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे.
आरोपींचे एन्काउंटरच करा : प्रवीण तोगडिया
नागपूर : परतवाडा येथील लैंगिक छळाच्या प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनीही उडी घेतली आहे. या आरोपींचे थेट एन्काउंटरच केले पाहिजे, सोबतच लव्ह जिहाद करणाऱ्यांवर देशभरातच कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी येथे पत्रपरिषदेत केली.