शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील नादुरुस्त शाळांचे आॅडिट करणार - तावडे

By admin | Updated: March 24, 2015 01:29 IST

मराठवाड्यातील निजामाच्या राजवटीतील शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, काही इमारती पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने अशा शाळा बंद करण्यात येतील

मुंबई : मराठवाड्यातील निजामाच्या राजवटीतील शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, काही इमारती पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने अशा शाळा बंद करण्यात येतील व शाळांच्या इमारतींचे आयआयटी अथवा व्हीजेटीआयच्या मदतीने स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याचा निर्णय विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.विक्रम काळे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून या शाळांच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीकरिता निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अन्यथा राज्य शासन या शाळांकरिता पैसा उपलब्ध करून देईल. मात्र तत्पूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यात येईल. तसेच महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) यामध्ये उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गात राजपत्रित मुख्याध्यापक या पदाचा समावेश आहे. या संवर्गात १०७३ पदे मंजूर असून, त्यापैकी ३५६ पदे भरलेली आहेत. मराठवाडा विभागात राजपत्रित मुख्याध्यापकांची मंजूर पदे २९९ असून, त्यापैकी केवळ ४५ पदे भरलेली आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांना मुख्याध्यापक होण्यात रस नसल्याने या पदाकरिता उमेदवार मिळत नाहीत, असे नमूद करून तावडे म्हणाले की, मुख्याध्यापकांच्या पदाकरिता राजपत्रित अधिकारी असण्याची अट काढून टाकून पदोन्नतीने ही पदे भरण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा करून आणण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)