शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्र्यांकडून अभ्यास समितीची घोषणा

By admin | Updated: August 14, 2016 21:33 IST

लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेवर पडणारा ताण आणि त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेवर पडणारा ताण आणि त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. लोकलवर येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी अभ्यासगट समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. सह्याद्री अतिथिगृह येथे रविवारी चिपळूण ते कराड रेल्वे मार्गाच्या कामासाठी कोकण रेल्वे व शापूरजी पालनजी कंपनीत सामंजस्य करार केला गेला. त्यावेळी प्रभू बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते व अन्य मंत्री तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रभू यापुढे म्हणाले की,मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज ८0 लाख प्रवासी प्रवास करत असून वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले नाही. रेल्वेवरील भार उचलण्यासाठी मेट्रोचे जाळे हे १५ ते २0 वर्षांपूर्वीच उभारण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे लोकलवरील येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यात कार्यालयीन वेळा बदलण्यात येणार असून त्यासाठी अभ्यास गटाची स्थापन करण्यात येईल. त्यांच्या अभ्यासानंतर पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. त्यासाठी खाजगी क्षेत्रानही मदत करावी, असे आवाहन केले. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाविषयी त्यांनी सांगितले की,या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील विकासाची दरी मिटणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास विकासाची गती वाढण्यास मदत मिळेल. रेल्वे मार्गाने बदंरणे जोडण्याबरोबरच विदर्भ-मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुंबईत एक लाख कोटींचे मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जागतिक बँकेची मदत घेताना रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट फंड उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रभू यांनी यावेळी दिली. सामंजस्य करारावर सह्याकोकण रेल्वे व शापूरजी पालनजी यांच्यात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या बांधणीसाठी परस्पर सामंजस्य करारावर सह्या झाल्या. यावेळी कोकण रेल्वे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. - प्रकल्पाची किंमत ३१९५.६0 कोटी- १0३ किमी प्रकल्पाची लांबी- ५८ पुल, १६ मोठे बोगदे, ८ किमीचा मोठा बोगदा- विहळे, मुंढे, कोयना रोड, पाठण, शेडगेवाडी आणि खोडाशी या सहा रेल्वे स्थानकांचाही समावेश. - सातारा ६६ किमी तर रत्नागिरीचा ३७ किमीच्या भागाशी संपर्क- प्रकल्पात वृक्षतोड टळणाररेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या दोन वर्षात लोकलची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा वारंवार केली. मात्र त्यावर ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांनी ही घोषणा केल्याने कार्यालयीन वेळेत बदल होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.