ZP निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नंबर २ वर; दोन्ही गट एकत्र आल्याचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 05:56 IST2026-02-10T05:55:40+5:302026-02-10T05:56:29+5:30

अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रितपणे घड्याळ चिन्हावर लढले. त्याचा काही ठिकाणी फायदा झाला, कारण त्यामुळे दोघांमधील मतांचे विभाजन टळले.

Ajit Pawar NCP is number 2 in the state in the ZP election result; Both NCP groups have the advantage of coming together | ZP निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नंबर २ वर; दोन्ही गट एकत्र आल्याचा फायदा

ZP निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नंबर २ वर; दोन्ही गट एकत्र आल्याचा फायदा

मुंबई - महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत राज्यात क्रमांक तीनवर राहिलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार गट) जिल्हा परिषद निवडणुकीत क्रमांक २ च्या जागा मिळविल्या. क्रमांक तीनवर असलेल्या शिंदेसेनेला त्यांच्यापेक्षा तीनच जागा कमी मिळाल्या. काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला सहानुभूती मिळाली असे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेतील सत्ता राखली. पक्षाचे संख्याबळ फार वाढले नाही तरीही सत्ता कायम राहिली. तथापि, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्हा परिषदांचा विचार करता राष्ट्रवादीबद्दल सहानुभूतीची मोठी लाट असल्याचे निकालावरून दिसत नाही. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रितपणे घड्याळ चिन्हावर लढले. त्याचा काही ठिकाणी फायदा झाला, कारण त्यामुळे दोघांमधील मतांचे विभाजन टळले. चिन्ह एकच असल्याचा वेगळा फायदाही झाला. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अजित पवार गटाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळाले. पक्षाच्या विजयी उमेदवारांनी हा  विजय अजित पवार यांना अर्पण केला आहे.

क्रमांक दोनचा पक्ष
भाजपला २२५ तर अजित पवार गटाला १६५ जागा मिळाल्या. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) तीन वर तर क्रमांक दोनवर शिंदेसेना होती. मात्र यावेळी शिंदेसेनेला १६२ जागा मिळून ते क्रमांक ३ वर राहिले.

आजचा हा निकाल म्हणजे अजित दादांच्या विचारांवरील, त्यांच्या नेतृत्वावरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे.  - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

Web Title : ZP चुनाव में अजित पवार की राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी दूसरे स्‍थान पर; गठबंधन का फायदा

Web Summary : अजित पवार की राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ZP चुनावों में दूसरा स्‍थान हासिल किया, दोनों गुटों के गठबंधन और एकीकृत प्रतीक से फायदा हुआ। भाजपा 225 सीटों के साथ आगे, राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी ने 165 सीटें हासिल कीं, जो शिंदे की सेना से ज्‍यादा हैं। जीत का श्रेय अजित पवार के नेतृत्‍व में विश्‍वास को दिया गया है।

Web Title : Ajit Pawar's NCP Ranks Second in ZP Elections; Alliance Benefits

Web Summary : Ajit Pawar's NCP secured second position in ZP elections, benefiting from the alliance of both factions and unified symbol. BJP leads with 225 seats, NCP secured 165, surpassing Shinde's Sena. The victory is attributed to faith in Ajit Pawar's leadership.