अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘Black Box’ची चर्चा; अपघाताचे कारण समोर येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:07 IST2026-01-28T14:06:34+5:302026-01-28T14:07:38+5:30

Ajit Pawar Plane Crash Black Box: ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचे नेमके कारण समोर येईल.

Ajit Pawar Death in Plane Crash: 'black box' in talks after Ajit Pawar's plane crash; cause of the accident will come to light | अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘Black Box’ची चर्चा; अपघाताचे कारण समोर येणार...

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘Black Box’ची चर्चा; अपघाताचे कारण समोर येणार...

Ajit Pawar Plane Crash Black Box: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमानअपघातात निधन झाले. लँडिंगदरम्यान, विमान जवळच्या शेतात कोसळले अन् मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात अजितदादांसह, विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा ‘ब्लॅक बॉक्स’ ची चर्चा सुरू झाली आहे. 

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

कोणत्याही विमान अपघातामागील नेमकी कारणे उलगडण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा असतो. ब्लॅक बॉक्स हा एक प्रकारचा फ्लाइट रेकॉर्डर असतो. यामध्ये विमान आणि त्या उड्डाणाशी संबंधित सर्व महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवला जातो. स्फोट, धडक, आग, अतिउच्च तापमान तसेच पाण्याचा मारा अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही हा डेटा सुरक्षित राहील, अशा पद्धतीने ब्लॅक बॉक्सची रचना केलेली असते. म्हणूनच विमान अपघातांची कारणे समजून घेण्यासाठी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत आवश्यक ठरतो.

ब्लॅक बॉक्सचा इतिहास

ब्लॅक बॉक्सचा शोध 1930 च्या दशकात फ्रेंच अभियंता फ्रान्स्वा हुसैनो यांनी लावला. त्यांनी फोटोग्राफिक फिल्मवर विमानाचे दहा वेगवेगळे पॅरामीटर्स नोंदवणारे उपकरण तयार केले होते. त्या काळापासून आजपर्यंत ब्लॅक बॉक्सच्या तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत गेली आहे.

याला ‘ब्लॅक बॉक्स’ का म्हणतात?

याला ‘ब्लॅक बॉक्स’ असे नाव देण्यात आले कारण सुरुवातीला हे उपकरण प्रकाश-रोधी पेटीत ठेवले जात असे. मात्र, प्रत्यक्षात ब्लॅक बॉक्सचा रंग नेहमीच नारंगी (ऑरेंज) असतो, जेणेकरून अपघातानंतर तो सहज सापडू शकेल. आजच्या ब्लॅक बॉक्समध्ये अत्याधुनिक मेमरी चिप्स वापरल्या जातात. यात हालचाल करणारे भाग नसल्यामुळे अपघातात ते खराब होण्याची शक्यता कमी असते.

अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?

ब्लॅक बॉक्स कसा काम करतो?

ब्लॅक बॉक्समध्ये दोन मुख्य भाग असतात:

फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR): यामध्ये विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती, दिशा अशा तांत्रिक बाबींची सतत नोंद होत असते.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR): कॉकपिटमधील पायलट्समधील संवाद, अलार्म आणि इतर आवाज यामध्ये रेकॉर्ड केले जातात.

याशिवाय, आधुनिक विमानांमध्ये ब्लॅक बॉक्सपासून वेगळे DVR (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) देखील असते. यामध्ये कॉकपिट आणि केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड होते, जे तपासासाठी अतिरिक्त माहिती पुरवते.

भीषण अपघातातही ब्लॅक बॉक्स कसा सुरक्षित राहतो?

ब्लॅक बॉक्स अतिशय कठीण परिस्थिती सहन करू शकेल अशा प्रकारे तयार केला जातो. यावर टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचे मजबूत आवरण असते. सुमारे 3,4000 पट गुरुत्वाकर्षण बल सहन करण्याची क्षमता, 1,100 अंश सेल्सियस तापमान एक तासापर्यंत सहन करू शकतो. याशिवाय, 6,000 मीटर खोल पाण्यात 30 दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकतो. पाण्यात ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी त्यामध्ये सिग्नल देणारे बीकन देखील बसवलेले असतात.

Web Title : अजित पवार विमान दुर्घटना: ब्लैक बॉक्स से खुलेगा हादसे का राज

Web Summary : बारामती में विमान दुर्घटना, जिसमें अजित पवार के निधन की झूठी खबर फैली, के बाद ब्लैक बॉक्स की चर्चा शुरू। ब्लैक बॉक्स उड़ान रिकॉर्डर है, जो दुर्घटनाओं की जांच में मदद करता है। यह उड़ान डेटा और कॉकपिट रिकॉर्डिंग रखता है, जो कारणों को समझने और भविष्य में घटनाओं को रोकने के लिए आवश्यक है।

Web Title : Ajit Pawar Plane Crash: Black Box Key to Unraveling Accident Cause

Web Summary : A plane crash in Baramati, falsely reported to involve Ajit Pawar, prompts black box discussion. Black boxes, crucial flight recorders, withstand extreme conditions, aiding accident investigations. They contain flight data and cockpit recordings, essential for understanding causes and preventing future incidents.