शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 06:30 IST

भुजबळ यांना मंगळवारी राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानलेले आभार लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनात फडणवीस यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली असे स्पष्ट संकेत मिळाले.

मुंबई : मराठा-ओबीसी आंदोलनाची धार कमी झालेली असताना आणि त्यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा आल्याने छगन भुजबळ यांच्या परतीचा मार्ग सुकर झाला आणि त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली.भुजबळ यांना मंगळवारी राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानलेले आभार लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनात फडणवीस यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली असे स्पष्ट संकेत मिळाले. ओबीसींच्या प्रश्नांबद्दलची कळकळ हा फडणवीस आणि भुजबळ यांना जोडणारा दुवा. भुजबळांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय हा अजित पवार, खा. सुनील तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल यांचा. भुजबळ मंत्री झाल्याने आता धनंजय मुंडे यांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत. अजित पवार गटाच्या कोट्यातील सर्व मंत्रिपदे भरली गेली आहेत. 

ओबीसी आधारासाठी निर्णय?मुंडेंसारखा ओबीसी चेहरा मंत्रिमंडळातून गेला, ओबीसी नेते भुजबळांना आधीच घेतलेले नव्हते. अशावेळी टोकाची नाराजी व्यक्त करणाऱ्या भुजबळांना पुन्हा मंत्री करणे ही अजित पवार यांची मजबुरी होती का? ओबीसींची नाराजी परवडणारी नव्हती म्हणून भुजबळ यांना पुन्हा मंत्री केले का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आधारासाठी अजित पवार यांनी भुजबळ यांना परत आणले आणि ओबीसी मतदारांची गरज असलेल्या भाजप, शिंदेसेनेनेही त्याचे स्वागत केले असे आता म्हटले जात आहे.

‘ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगलं...’भुजबळ यांनी मध्यंतरी अजित पवारांवर टीका केली होती, ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहना’ असे म्हणत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मंगळवारी भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पक्षाने आठ दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मी शपथ घेतली. मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार. शेवट चांगला ते सगळं चांगलं.

ओबीसींचा आवाज म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे बघितले जाते. भुजबळांसारखे ज्येष्ठ मंत्री, ओबीसी हितचिंतक मंत्रिमंडळात आल्याने त्याचा सरकारला फायदा होईल.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस