शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...

By यदू जोशी | Updated: April 28, 2026 09:06 IST

महाराष्ट्रातील जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीच्या टप्प्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १४१ मुख्य प्रशिक्षक आणि ३,८५० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

यदु जोशीमुंबई : जनगणनेदरम्यान नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. ही माहिती कोणत्याही न्यायालयात पुराव्यासाठी वापरता येत नाही आणि ती प्राप्तिकर, पोलिस विभागासह कोणत्याही विभागाला शेअर केली जात नाही, असे महाराष्ट्राच्या जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे (आयएएस) यांनी स्पष्ट केले. जनगणनेविषयीच्या शंकांना उत्तरे देतानाच त्यांनी  जनगणनेचे टप्पे कसे असतील, याविषयी ‘लोकमत’शी सविस्तर चर्चादेखील केली.

जनगणनेतील वैयक्तिक माहितीची गोपनीयता बाळगली जाते का?डॉ. डांगे - अर्थात! पूर्ण गोपनीयता बाळगली जाते. जनगणनेचा उद्देश हा करवसुली किंवा तपासणी नसून केवळ नियोजनासाठी सांख्यिकीय डेटा गोळा करणे हा आहे. 

जनगणनेत एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? डॉ. डांगे - जनगणना कायदा, १९४८च्या कलम ११ (१) (ड) अंतर्गत, जनगणना प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा खोटी माहिती देणे हा गुन्हा आहे. या कलमानुसार दोषी व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.  

देशाच्या धोरण आखणीसाठी जनगणना कशी महत्त्वाची आहे?डॉ. डांगे - कल्याणकारी योजनांचे नियोजन, संसाधनांचे न्याय्य वाटप, मतदारसंघांची पुनर्रचना, आपत्ती व्यवस्थापन, स्थलांतर आणि शहरीकरण नियोजन या दृष्टीने जनगणनेचे मोठे महत्त्व आहे. लोकसंख्येचे अचूक आकडे मिळतात, सामाजिक-आर्थिक स्थिती कळते, त्यामुळे सरकारला योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येते. पायाभूत सुविधांची उभारणी कुठे आवश्यक आहे ते स्पष्ट होते. शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे अचूक नियोजनकरता येते. 

महाराष्ट्रात प्रत्यक्ष जनगणना कधी सुरू होईल, त्याचे टप्पे कसे असतील?डॉ. डांगे - जनगणनेचे दोन टप्पे असतील. त्यात आधी असेल ती -स्व-गणना (सेल्फ इन्युमरेशन), त्यात नागरिक स्वतःची माहिती ऑनलाइन भरू शकतात, यासाठी १ मे ते १५ मे २०२६ पर्यंत पोर्टल खुले राहील. असा पर्याय पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरयादी व घरगणना कार्य : प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील. दुसरा टप्पा - लोकसंख्या गणना : प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणार आहे.

महाराष्ट्रातील जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीच्या टप्प्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १४१ मुख्य प्रशिक्षक आणि ३,८५० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. डेटा संकलनामध्ये एकसमानता आणि अचूकता राखण्यासाठी, २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत सुमारे २.३ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. यासोबतच, जिल्हा आणि महापालिका स्तरावर ‘हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स’ म्हणजेच घरयादी गट निश्चित करण्याचे आणि त्यानंतर कर्मचारी वाटपासाठी पर्यवेक्षकीय मंडळे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तांत्रिक तयारीला पूरक म्हणून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि ‘स्व-प्रगणने’च्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्यभर व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवली जात आहे.

शेवटच्या माणसाची गणनादुर्गम, अतिदुर्गम भागात वाड्यावस्त्यांवर राहणार्या व्यक्तींचीही गणना झालीच पाहिजे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज असेल. जनगणनेची जबाबदारी असलेले कर्मचारी/शिक्षक हे झोकून देऊन काम करतील असा आमचा ठाम विश्वास आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Census doubts cleared: Personal data is confidential; false info punishable.

Web Summary : Census data is confidential and used for planning, not investigation. Providing false information is punishable with fines or imprisonment. The census includes self-enumeration (May 1-15, 2026), house listing (May 16-June 14, 2026), and population counting (Feb-Mar 2027). Extensive training is underway for enumerators.