शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर उदयनराजेंनी म्हटलं 'सॉरी' चुकलो; पण शशिकांत शिंदेंनी दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 09:04 IST

तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे.

मुंबई - सातारा येथील भिवडी गावातील कार्यकर्त्यांच्या लग्नात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट झाली. मात्र ही भेट चुकून झालेली होती. अश्रू अनावर झाले अशा बातम्या निराधार आहेत. उदयनराजेंचा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी दिलं आहे. 

शशिकांत शिंदे यांनी ट्विट करुन म्हटलंय की, महादेश शेलार नावाच्या कार्यकर्त्यांचं भिवडी येथे लग्न होतं. त्यावेळी मी तिथे गेलो होतो. एका बाजूला उभा असताना उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. सॉरी चुकलो असं दोन वेळा ते म्हणाले, मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही. पुढे त्यांना म्हणालो की, तुम्ही स्वत:चे नुकसान करुन घेतले आणि माझेही केले. २० वर्षाच्या राजकारणात माणूस कष्ट करुन निवडून यायला जातो त्यावेळेस आज जर निवडून आलो असतो तर पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिली असती. त्याला मुकलो आहे अशी खंत व्यक्त केली. 

तसेच तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे. त्यामुळे आता सॉरी बोलून फायदा नाही. आता त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे ज्या अश्रू आले वैगेरे बातम्या आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेसोबत ठाम आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आतापर्यंत मी पार पाडत आलो आहे. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि मी माझ्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिली. एवढ्यापुरतीच ही भेट मर्यादित होती असा खुलासा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, उदयनराजे आणि माझा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी हे सत्य मी समोर आणलं आहे. शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात काम करत आहे अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेंनी मित्राचं ऐकलं नाही किंवा राजेंना थांबविण्यात शिंदेंना अपयश आले. त्यामुळे निवडणूक काळात हे सख्खे मित्र पक्के वैरी बनल्यासारखं दिसून आलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोडपट पक्षाची भूमिका पार पाडली. त्यामुळे दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झाला. 

 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा