शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मोनिका राजळे यांच्याविरुद्धचं बंड थंड; पंकजा मुंडेंच्या फिरकीने कार्यकर्ते गप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 14:46 IST

Maharashtra Assembly Election 2019 : ढाकणे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंदाज बांधू नका, असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. यामुळे राजळे यांची उमेदवारी सध्या तरी सुरक्षित दिसत असून ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही अंशी पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते ऍड. प्रताप ढाकणे यांना भाजपकडून उमदेवारी द्यावी, या मागणीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्धच बंड अखेर शमले. उलट पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेत राजळे यांची उमेदवारी सुरक्षित असल्याचे संकेत दिले.

पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी १५० हून अधिक कार्यकर्ते परळीत दाखल झाले होते. शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून मोनिका राजळे यांच्या ऐवजी ऍड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्याकडे केली. यावर पंकजा म्हणाल्या की, तुम्ही ज्यांच्यासाठी उमेदवारी मागत आहात, ते माझ्या पक्षातच नाहीत. ते राष्ट्रवादीत आहे. आपल्या पक्षातच नाही, त्यांच्यासाठी उमेदवारी कशी मागता. ज्यांना हवी त्यांनी कधी मागितली नाही असं सांगताना मुंडे साहेब असताना ढाकणे राष्ट्रवादीत गेले होते. त्यांना कशी उमेदवारी देता येईल, असा सवालही मुंडे यांनी केला. तसेच ढाकणे यांना उमेदवारी देण्यावर नकार दर्शविला.

यावेळी कार्यकर्त्यांनी मोनिका राजळे यांना उमेदवारी देऊ नका. त्यांच्यावर २५ टक्के कार्यकर्ते नाराज असल्याचा सूर लावला. त्यावर पंकजा यांनी मला यावर विचार करायला वेळ द्या, असं सांगितले. यावेळी त्यांनी ढाकणे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंदाज बांधू नका, असंही कार्यकर्त्यांना सुनावले. यामुळे राजळे यांची उमेदवारी सध्या तरी सुरक्षित दिसत असून ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही अंशी पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेshevgaon-acशेवगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा