शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के कृषी विकासाचे उद्दिष्ट गाठणारच -मुख्यमंत्री

By admin | Updated: May 30, 2014 02:35 IST

राज्याच्या कृषी विभागाने २०१४-१५ साठी राज्याने ठरविलेले १० टक्के कृषी विकास दराचे उद्दिष्ट ठेवले असून ते निश्चितच पूर्ण केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला.

मुंबई : या वर्षी राज्याच्या कृषी विभागाने २०१४-१५ साठी राज्याने ठरविलेले १० टक्के कृषी विकास दराचे उद्दिष्ट ठेवले असून ते निश्चितच पूर्ण केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. कृषी व पणन विभागाने यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील जवळजवळ दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम पीक घेतले जाते. कृषी नियोजनासाठी हा हंगाम सर्वात महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे या हंगामाचे पूर्ण नियोजन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, विभागवार बैठकीत अशा पद्धतीचे नियोजन करण्यात काही अडचणी येत होत्या. म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर खरीप हंगाम पूर्व बैठक घेण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. तो फलदायी ठरत असल्याचे निदर्शनास आले. हवामान बदलामुळे अनेकदा राज्यावर दुष्काळाचे सावट येते. गेल्या एकाच वर्षात आपल्याला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यांना सामोरे जावे लागले. गेल्या शंभर वर्षांत अशी गारपीट कधीच झाली नव्हती. त्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले. अर्थात शेतकर्‍यांसाठी मदत व पुनर्वसन विभागामार्फत ६६३५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. टोल फ्री क्रमांक, भरारी पथके यामुळे काळाबाजार रोखण्यात यश आले असून, खत आणि बियाणे यांचा काळाबाजार करणार्‍या १० हजार विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ठिबक सिंचनाचे १३०० कोटी रुपयंचे अनुदान त्वरित वितरित करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीज जोडण्यांना प्राधान्य दिले जाईल. कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खरीप आढावा बैठकीचे प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)