डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:52 IST2026-04-20T15:50:18+5:302026-04-20T15:52:10+5:30

सकाळी उठल्याबरोबर फोनवर येणारे ५० नोटिफिकेशन्स, कॉलेज असाइनमेंटची निवड, दुपारच्या जेवणाचा मेन्यू, संध्याकाळी कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचे आणि कंपनीचे टार्गेट कसे पूर्ण करायचे... अशा सततच्या प्रश्नांमुळे आजच्या तरुणांचा मेंदू पूर्णपणे थकला आहे.

The danger of digital lifestyle; It is having a major impact on the decision-making ability of the youth | डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 

AI Image

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : सकाळी उठल्याबरोबर फोनवर येणारे ५० नोटिफिकेशन्स, कॉलेज असाइनमेंटची निवड, दुपारच्या जेवणाचा मेन्यू, संध्याकाळी कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचे आणि कंपनीचे टार्गेट कसे पूर्ण करायचे... अशा सततच्या प्रश्नांमुळे आजच्या तरुणांचा मेंदू पूर्णपणे थकला आहे. सतत निर्णय घेण्याच्या या थकव्याला वैद्यकीय भाषेत ‘डिसीजन फटीग’ असे म्हटले जाते. शहरांमधील मनोरोग तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ४० ते ५० टक्के तरुण याच समस्येने ग्रस्त आहेत. 

काय आहे ‘डिसीजन फटीग’?

‘डिसीजन फटीग’ ही एक मनोवैज्ञानिक स्थिती आहे. जेव्हा मेंदू कामाचे अनेक पर्याय हाताळताना थकून जातो, तेव्हा व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. अशा स्थितीत माणूस गोंधळलेला आणि चिडचिडा होतो. डॉक्टरांच्या मते, आता “काहीही ठरवण्याची हिंमत उरलेली नाही,” अशी तक्रार करणारे तरुण वाढत आहेत.

थकव्याची लक्षणे

- मेंदू जड वाटणे आणि विचार करण्यासाठी जास्त वेळ लागणे.
- व्यक्ती महत्त्वाचे निर्णय घेणे टाळते किंवा छोटी कामे नंतरवर ढकलते.
- घाईघाईत चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा निर्णय घेण्याचे टाळलेच जाते.
- स्वतःवरचा विश्वास कमी होणे आणि स्वतःच्याच निर्णयांवर शंका घेणे.
- निर्णय घेण्याची क्षमता शून्य होणे 

या गोष्टींची काळजी घ्या 

- हत्त्वाचे आणि कठीण निर्णय सकाळी घ्या, कारण त्यावेळी मानसिक ऊर्जा सर्वाधिक असते.
- स्वतःसाठी एक निश्चित व हेल्दी रूटीन बनवा व त्याचे पालन करा. विविध गोष्टींमधील पर्याय मर्यादित ठेवा
- दर ६० ते ९० मिनिटांच्या कामानंतर छोटा ब्रेक नक्की घ्या.
- सतत स्क्रीन पाहणे किंवा काम करणे टाळा, मेंदूला विश्रांती द्या.
- पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या, जेणेकरून मेंदूची कार्यक्षमता टिकून राहील.

Web Title : डिजिटल जीवनशैली का खतरा: युवाओं की निर्णय क्षमता पर बड़ा असर

Web Summary : डिजिटल जीवनशैली युवाओं में 'डिसीजन फटीग' का कारण बन रही है, जिससे निर्णय लेने की क्षमता और मानसिक स्वास्थ्य प्रभावित हो रहा है। लगातार नोटिफिकेशन और निर्णय मस्तिष्क को थका देते हैं, जिससे निर्णय लेने में कमजोरी, चिड़चिड़ापन और चीजों से बचने की प्रवृत्ति बढ़ जाती है। नींद, स्वस्थ दिनचर्या और ब्रेक को प्राथमिकता दें।

Web Title : Digital Lifestyle Threat: Impairs Young Adults' Decision-Making Ability Significantly

Web Summary : Digital overload causes 'Decision Fatigue' in youth, impacting choices and mental health. Constant notifications and decisions exhaust the brain, leading to impaired judgment, irritability, and avoidance. Prioritize sleep, healthy routines, and breaks to combat this fatigue and improve decision-making skills.