Latur: उसाच्या फडामध्ये सुरू होता भलताच प्रकार, पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 00:41 IST2026-03-19T00:37:50+5:302026-03-19T00:41:08+5:30

लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने गोंदेगाव (ता. लातूर) शिवारात छापा टाकून गांजाची लागवड उघडकीस आणली.

What was growing in the fields under the name of sugarcane? How the police exposed the racket, one arrested! | Latur: उसाच्या फडामध्ये सुरू होता भलताच प्रकार, पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली!

Latur: उसाच्या फडामध्ये सुरू होता भलताच प्रकार, पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली!

जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने गोंदेगाव (ता. लातूर) शिवारात छापा टाकून गांजाची लागवड उघडकीस आणली. उसाच्या फडातच लागवड केलेली १०८ गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. याबाबत गातेगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील राजकुमार छत्रभुज देशमुख (वय ५६) हा आपल्या शेतात उसाच्या आडोशाला गांजाची लागवड करत होता. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, महसूल विभागाच्या पथकाने गट क्रमांक १३२ मध्ये बुधवारी संयुक्तपणे छापा मारला. यावेळी पोलिसांना उसाच्या फडात लपवलेली ३४ किलो ८०५ ग्रॅम वजनाची तब्बल १०८ झाडे आढळून पकडली. जप्त केलेल्या या गांजाची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत ५ लाख २२ हजार ०७५ रुपये होत आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस, महसूल आणि कृषी विभागाच्या उपस्थितीत करण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले आहे. याबाबत आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी केले. पथकामध्ये नायब तहसीलदार गजानन अंबर, स्थागुशाचे पाेलिस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पाेलिस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सर्जेराव जगताप, मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, सुहास जाधव, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक टी.टी. टेकाळे, राहुल अंधारे, कृषी विभागाचे दिलीप पोतदार यांचा सहभाग होता.

Web Title : लातूर: गन्ने के खेत में गांजे की खेती, किसान गिरफ्तार

Web Summary : लातूर पुलिस ने गोंदेगांव में गन्ने के खेत में छिपे गांजे के बागान का पता लगाया, एक किसान को गिरफ्तार किया। अधिकारियों ने लगभग 34 किलोग्राम वजन के 108 गांजे के पौधे जब्त किए, जिनकी कीमत 5 लाख रुपये से अधिक है। नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटेंस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है।

Web Title : Latur Farmer Arrested: Ganja Cultivation Discovered Hidden Among Sugarcane

Web Summary : Latur police discovered a ganja plantation hidden within a sugarcane field in Gondegaon, arresting one farmer. Authorities seized 108 ganja plants, weighing approximately 34 kilograms, valued at over ₹5 lakh. A case has been registered under the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act.