शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

‘हीट स्ट्रोक’चा मुक्या जनावरांनाही फटका; लातूर जिल्ह्यात लाखमोलाची बैलजोडी दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:46 IST

निलंगा तालुक्यातील सावरी येथील घटना; तापमानाचा पारा ४३ अंशांंवर

औराद शहाजानी (जि. लातूर) : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून, औराद शहाजानी परिसरातील तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. या रणरणत्या उन्हाचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. निलंगा तालुक्यातील सावरी येथे शेतात बांधलेल्या बैलजोडीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

सावरी येथील शेतकरी मदन भंडारे यांनी बुधवारी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी बैलजोडीच्या मदतीने शेताची मशागत केली होती. दुपारी बैलांना झाडाखाली सावलीत बांधले होते. सायंकाळी मेहनत केल्यानंतर बैलांना पाणी पाजून ते घराकडे गेले. रात्री नऊच्या सुमारास पुन्हा शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना एक बैल जमिनीवर कोसळलेला दिसला, तर दुसऱ्या बैलाच्या तोंडातून विचित्र आवाज येत होता. भंडारे यांनी तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले, मात्र डॉक्टर येण्यापूर्वीच दुसऱ्या बैलानेही त्यांच्या डोळ्यादेखत प्राण सोडला.

गुरुवारी सकाळी निलंगा तहसील प्रशासनाच्या वतीने तलाठी बालासाहेब मोहळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. औराद शहाजानी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी ठाकूर यांनी पथकासह बैलांचे शवविच्छेदन केले. त्यांच्या अहवालानुसार, अति उष्णतेमुळे बैलांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आणि ‘हीट स्ट्रोक’ बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतीची कामे तोंडावर असताना दीड लाखाची जोडी गेल्याने आता शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

तापमानाचा लपंडाव आणि रात्रीची उष्णतासध्या कमाल तापमान ४३ अंश असले तरी किमान तापमानही ३२ अंशांवर पोहोचले आहे. रात्री १२ वाजेपर्यंत जमिनीतून गरम वाफा बाहेर येत असल्याने जनावरांना श्वसनाचा त्रास होत आहे. या भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत परिसरात दोन नागरिकांचे बळी गेले असतानाच, आता मुक्या जनावरांच्या मृत्यूने शेतकरी, पशुपालकांची धास्ती वाढली आहे.

दिवसा तसेच रात्रीही जनावरांची काळजी घ्यासध्या तापमानाचा पारा अधिकच वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेण्यासोबतच जनावरांची काळजी घ्यावी. सकाळी १० ते ५ या वेळेत उन्हात जनावरे बांधू नयेत, जनावरांना पुरेशी सावलीची व्यवस्था करावी. दिवसातून किमान तीनवेळा ताजे पाणी पाजावे, असे निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Kills Livestock: Farmer Loses Valuable Bulls in Latur

Web Summary : A Latur farmer lost his prized bullock pair to heatstroke amidst scorching temperatures. The animals succumbed despite efforts to provide shade and water. Veterinary reports confirmed heat as the cause. The incident highlights the severe impact of the heatwave on animals.
टॅग्स :Heat Strokeउष्माघातFarmerशेतकरीlaturलातूर