शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा हर्षवर्धन पाटील कुठे गेले होते?

By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST

अशोकराव पवार यांची विचारणा : ‘के.पी.ं’ची भूमिकाही चुकीची

कोल्हापूर : काँग्रेसची सत्ता राज्यात असताना तेव्हा सहकारमंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांनी ऊसदराचा प्रश्न सुटावा, यासाठी एकदाही बैठक घेतली नाही. आता सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांनी सरकारने हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त करणे हा त्यांचा कावेबाजपणा असल्याची टीका शेकापचे नेते व भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील यांनी आज, सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुण्यात साखर संकुलाची तोडफोड केली. त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांकडे लक्षच देणार नसेल तर किती दिवस संयम बाळगायचा, हा देखील प्रश्न आहे. शेतकरी कामगार पक्षही ऊसदराच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करत आला. परंतु, तोडफोडीचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रश्न सुटावा, यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही. आज मात्र तेच दुसऱ्याकडे बोट दाखवित आहेत.’
सांगली जिल्ह्णातील सर्व कारखान्यांनी एकत्रित येऊन टनास १८०० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांना ऊस कुणाला घालायचा? असा प्रश्न पडला आहे.
सांगलीतील कारखानदार संघटित असल्याने त्यांनी एकत्रित असा निर्णय घेतला. परंतु, कोल्हापूर जिल्ह्णात हे शक्य झाले नाही, कारण ऊसदर देण्याबाबतही काही कारखानदार दुटप्पी भूमिका घेतात. भोगावती कारखान्याने दराच्या स्पर्धेत राहायचे म्हणून ‘एफआरपी’प्रमाणे २५९२ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांसाठी समन्वयातून मार्ग काढा
सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कारखान्यांवर कारवाई करण्याची भाषा करत आहेत; तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांना कारवाई कराच, असा इशारा दिला आहे. या दोन्ही भूमिका साखर कारखानदारीस अडचणीत आणणाऱ्या आहेत. दोघांनी समन्वयानेच या अडचणीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.