शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नेसरीत रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा उद्रेक; पोलिसांच्या भूमिकेवर आंदोलकांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:37 IST

वळीव पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन अपघात, आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांचे असहकार्य 

नेसरी : चंदगड–गडहिंग्लज राज्य मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला. एक पदरी काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या पदरीचे काम रखडल्याने रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

दरम्यान, सलग वळीव पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन अनेक वाहने घसरून अपघात झाले. काही प्रवाशांना एसटी बस थांबल्याने दीड-दोन किलोमीटर पायी जावे लागले. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी काल, मंगळवारी संबंधित कंपनीचे डंपर अडवून आंदोलन केले. सरपंच गिरीजादेवी शिंदे यांनी रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत काम पूर्ण होईपर्यंत गाड्या अडवण्याचा इशारा दिला. 

पोलिसांनी केले नाही सहकार्य

यावेळी संबंधित कंपनीचे डंपर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस स्टेशनमध्ये लावत असताना यावर तोडगा व चर्चा न करता पोलिसांनी तुमचं तुम्ही बघा. हे पार्किंग नाही. दुसऱ्या ठिकाणी गाड्या लावा असा सल्ला दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. तसेच पत्रकार मधस्ती करण्यास पुढे आले असता तुम्ही गप्प बसा, तुम्हाला ओळखत नाही असे म्हणत आपली जबाबदारी ढकलून दिली.

प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन 

दरम्यान रस्ते प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वरिष्ठांना बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र पोलिसांच्या या भूमिकेवरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur villagers protest road work delays; police response criticized.

Web Summary : Nesari villagers protested against slow road construction, causing traffic issues and accidents. Police inaction during the protest angered residents. Authorities promised action.