शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 19:37 IST

bribe,crimenews, kolhapurnews, पाझर तलावात मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी सुमारे १८ हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ताराबाई पार्क येथील सिचन भवनध्ये मृद व जलसंधारण विभागात सोमवारी सायंकाळी पथकाने  ही कारवाई केली.

ठळक मुद्देमत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी लाच स्विकारली सिंचन भवनमध्ये मृद व जलसंधारण विभागात कारवाई

कोल्हापूर : पाझर तलावात मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी सुमारे १८ हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ताराबाई पार्क येथील सिचन भवनध्ये मृद व जलसंधारण विभागात सोमवारी सायंकाळी पथकाने  ही कारवाई केली.

जलसंधारण अधिकारी शिवाजी हणमंत नेरकर (वय ५२, रा. प्लॉट नं. १५, निवारा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) व कार्यकारी अभियंता यशवंत लक्ष्मण थोरात (वय ५५, रा. वारणा बंगला, सिंचन भवन जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. मुळ रा. डी. २, गणेश गार्डन, बिबवेवाडी, पुणे) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.तक्रारदाराला पाझर तलावामध्ये मत्स्यव्यवसाय करण्यासाठी परवाना हवा होता. त्यासाठी तो गेले अनेक दिवस ताराबाई पार्कमधील वारणा भवनमधील जलसंधारण विभागातील मृद व जलसंधारण विभागात फेऱ्या मारत होता.जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर व कार्यकारी अभियंता यशवंत थोरात या दोघांशी त्याची चर्चा सुरु होती. त्यावेळी हा परवाना देण्यासाठी संशयीत नेसरकर याने २० हजाराची मागणी केली. कार्यकारी अभियंता थोरात यांना ही रक्कम द्यावी लागते असे सांगून लाच मागितली. तडजोडअंती सुमारे १८ हजार देण्याचे निश्चीत झाले.दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताराबाई पार्कमधील सिंचन भवनच्या मृद व जलसंधारण विभागात सापळा रचला.

त्यावेळी तक्रारदाराकडून नेजकर याने लाच स्विकारली, त्याने पैसे घेतल्याचे कार्यकारी अभियंता थोरात यांना कल्पना दिल्यानंतर त्यानीही मागणीस संमती दर्शवली. सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोघांनाही पकडून त्याच्या ताब्यातील लाचेची १८ हजाराची रक्कम ताब्यात घेतली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. जितेंद्र पाटील, सहा. फौ. संजीव बंबर्गकर, हे. कॉ. शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने यांनी केली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर