शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

झाडांमधून काढले दोन किलो खिळे अन् १०० बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 13:57 IST

environment, kolhapur, trees कुणीही उठावे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खिळा ठोकावा, त्यांच्यावर एखादा बोर्ड लटकवावा.... हे वृक्षप्रेमींसाठी प्रचंड यातनादायी. वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत म्हटल्यावर वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेने स्वत:च एक शिडी घेतली, पक्कड घेतली आणि शहरात सुरू झाली, जाहिरात बोर्ड व खिळेमुक्त वृक्ष मोहीम.

ठळक मुद्देझाडांमधून काढले दोन किलो खिळे अन् १०० बोर्डवृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेचा उपक्रम : जाहिरात बोर्डमुक्त वृक्षमोहीम

कोल्हापूर : कुणीही उठावे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खिळा ठोकावा, त्यांच्यावर एखादा बोर्ड लटकवावा.... हे वृक्षप्रेमींसाठी प्रचंड यातनादायी. वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत म्हटल्यावर वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेने स्वत:च एक शिडी घेतली, पक्कड घेतली आणि शहरात सुरू झाली, जाहिरात बोर्ड व खिळेमुक्त वृक्ष मोहीम.

झाडांच्या बुंध्यातून दोन किलो खिळे निघाले, तर १०० बोर्ड काढून टाकण्यात आले. झाडाभोवतीचे सिमेंटचे कट्टे तर फोडून काढण्यात आले. तरुणांच्या या पुढाकाराने झाडांचा कोंडलेला श्वास पुन्हा एकदा मोकळा झाला आणि वृक्षप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.वृक्षसंवर्धन कायद्यानुसार झाडांवर खिळे मारणे, बोर्ड लटकवणे, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचविणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे; पण याचे पालन सुजाण नागरिक म्हणून कोणीही करत नाही.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे फक्त अभंगापुरतेच राहते. झाडांना मित्र म्हणून कधी वाढवले जात नाही. उलट दिसले झाड की मार खिळा, लटकव त्याला बोर्ड आणि आपल्या उत्पादनाची जाहिरात कर, असे सर्वसाधारण सर्वांचे वर्तन दिसते.कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, बागल चौक या व्यापारी पेठा, तेथे माणसांची वर्दळ तशीच झाडांचीही गर्दी आहे. मोठमोठे वृक्ष अजूनही डौलदारपणे उभे असल्याचे दिसतात; पण या झाडांकडे पाहिले की जाहिरातींचे बोर्ड लावून त्यांचे विद्रूकरण केल्याचेच दिसते.

वारंवार आवाहन करूनही लोक दाद देत नसल्याने वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेने विशेष मोहीम राबवीत या झाडांचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. परत झाडांना इजा करू नका, असे आवाहनही यावेळी वृक्षप्रेमींनी केले.यात संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, सौरभ कापडी, प्रसाद भोपळे, पारितोष उरकुडे, विकास कोंडेकर, तात्या गोवावाला, शैलेश टिकार, अमित यादव, उदयसिंह जाधव, प्रवीण मगदूम यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर