शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

किणी टोलनाक्याची तोडफोड

By admin | Updated: August 27, 2015 01:18 IST

पैलवानांचे कृत्य : मारहाणीत १५ कर्मचारी गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल

किणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोलनाक्यावर झालेल्या किरकोळ वादावादीतून कोल्हापूर येथील चाळीस ते पन्नास पैलवानांनी टोलनाक्याची प्रचंड तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. त्यात पंधरा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडहून कोल्हापूरच्या दिशेने कारमधून जाणाऱ्या पैलवानांची किणी नाक्यावर टोल देण्यावरून वादावादी झाली होती. या वादावादीतून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे चाळीस ते पन्नास पैलवानांनी काठ्या, हॉकी स्टीक यांच्यासह टोलनाक्यावर अचानक चाल केली. काठ्या व लाथांनी टोलनाक्यावरील आठही बुथची त्यांनी तोडफोड सुरु केली. केबीनच्या काचा व जाळ्यांचा त्यांनी चुराडा केला. यावेळी दिसेल त्या टोल कर्मचाऱ्याला या पैलवानांनी बदडून काढले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे टोलनाक्यावरील इतर कर्मचारी भयभीत होऊन बूथ सोडून पळू लागले. त्यांचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुमारे पंधरा कर्मचारी जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला, हाता-पायाला गंभीर मार लागला आहे. घटनेनंतर टोलनाक्यावर काचांचा खच पडला होता. तर केबीन शेजारी अनेक कर्मचाऱ्यांचे रक्त सांडले होते. या मारहाणीत टोल कर्मचारी संदीप बाळासो उतळे (वय ३३), बाबासो सिद (३८), सुनील भोसले (३०), तुषार जाधव (२३), निवास रघुनाथ मोहिते (२३), सचिन भोसले (३६), भगवान वसंत जाधव (३८, सर्व रा. घुणकी), नीलेश घोलप (किणी), आॅपरेटर सुधीर देसाई (२४), एम. के. नायक (२४), सी. एन. बहुरा (२२), ब्रह्मा कांबळे (२६), एस. आर. दास (२५), एस. एस. थोरात (२६, सर्व रा. किणी) हे जखमी झाले. यातील तिघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांवर पेठवडगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या घटनेने कर्मचारी भयभीत झाले होते. तर नाक्यावर तणावपूर्ण वातावरण पसरले होते. या मारहाणीनंतर हे पैलवान टाटा सुमोतून निघून गेले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पेठवडगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते. (वार्ताहर)शेतात शोधून मारहाणमारहाण सुरु असताना टोल नाक्याच्या बुथवरुन कर्मचारी भीतीमुळे जवळच असणाऱ्या सोयाबिनच्या शेतात पळून गेले. अंधारातच त्यांचा पाठलाग करुन त्यानां पैलवानांनी शेतातच मारहाण केली. या मारहाणीत शेतात एक कर्मचारी जखमी होऊन पडला होता. त्याला शोधून उपचारासाठी पाठविले.