शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘डिजिटल अरेस्ट’चे रॅकेट देशाबाहेरही असल्याची शक्यता, पुण्यातून आणखी दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:36 IST

२७ लाख रुपये मिळाले परत

कोल्हापूर : येथील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती घालून ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापूरपोलिसांनी पुण्यातून आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी ताब्यात घेतलेल्या दोघांसोबतच या दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता देशाबाहेर आणि देशाबाहेरूनही हे रॅकेट चालवले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मनी लाँड्रिंगच्या खटल्याप्रकरणी डिजिटल अरेस्टची भीती घालून मीना मुरलीधर डोंगरे (वय ७५, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना एका टोळीने ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. काही दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. केवळ हे एकच प्रकरण नव्हे तर या सायबर भामट्यांनी २७ मे रोजी एकाच दिवसात ११ बँक खात्यांमधून अनेकांना १३ कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले होते. यातील १० खात्यांवर २७ मे रोजी तब्बल १३ कोटी रुपये वर्ग झाले. हे सर्व पैसे इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.

ही फसवणुकीची रक्कम चेन्नई, जयपूर, मुंबई, पुणे, पंजाब, आसाम, ओडिशा यासह विविध राज्यांतील १२ बँकांच्या वेगवेगळ्या ३९ खात्यांमध्ये वर्ग केल्याचे पोलिस तपासात आढळले. यानंतर आणखीन ७० बँक खात्यांची माहिती समोर आली असून पोलिसांनी आतापर्यंत १३० हून अधिक बँक खात्यांची तपासणी केली आहे. याच चौकशीतून ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे समोर आली आहेत. यातून या चौघांना ताब्यात घेतले आहे.

समोरासमोर चौकशी

या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सुरुवातीला पिंपरी येथून एकास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून आणखी एकाचे नाव समजले. या दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असताना आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. आता या चौघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.

२७ लाख रुपये मिळाले परत

पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २७ लाख रुपये परत मिळवले आहेत. ही रक्कम काही दिवसांतच फिर्यादी मीना मुरलीधर डोंगरे यांना परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस