शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Mayor Election: महापौर, उपमहापौर पदांची नावे सोमवारी दुपारी जाहीर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:45 IST

महापौरपद कोणाकडे जाणार, यावर अन्य पदांची वाटणी केली जाणार

कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत असणाऱ्या महायुतीमधील नेत्यांची महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या दोन-तीन दिवसात बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर, उपमहापौर पदासह कोणत्या पक्षाकडे कोणती पदे द्यायची, यावर चर्चा होणार आहे. जरी बैठक झाली तरी महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवारांची नावे सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी जाहीर करण्यात येणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आता महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. महायुतीत तीन पक्ष असल्याने ज्या पद्धतीने निवडणुकीत जागा वाटप झाले, त्याच पद्धतीने सत्तेतील पदांची वाटणीही करावी लागणार आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपसह शिंदेसेनेचाही आग्रह राहणार आहे. या दोन पक्षात महत्त्वाच्या पदासाठी जोरदार रस्सीखेच होईल.

महापालिकेची निवडणूक होते न होते तोच जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. ज्या पद्धतीने महापालिकेवर सत्ता मिळविली, तशीच ती जिल्हा परिषदेवरही मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जागा वाटपात जास्त वाद न घालता जेथे शक्य आहे, तेथे एकमेकांची मदत घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील पदाबाबत चर्चा करायला वेळ मिळालेला नाही. परंतु आता चर्चा करण्याचे निरोप दिले गेले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीतून माघारीची मुदत संपल्यानंतर आता नेते थोडे मोकळे झाले आहेत. म्हणून येत्या दोन-तीन दिवसांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची एक बैठक होणार आहे.

महापौर भाजपचेच

महायुतीत सर्वाधिक जागा २६ जिंकणाऱ्या भाजपला महापौरपद पाहिजे आहे. त्यांच्याकडून इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी आपले दावे करण्यास सुरुवात केली आहे. महापौरपद कोणाकडे जाणार, यावर अन्य पदांची वाटणी केली जाणार आहे. भाजपने महापौरपद मागितले तर उपमहापौरसह स्थायी समिती सभापतीपद हे शिंदेसेना सोडणार नाही.

राष्ट्रवादीचाही आग्रही दावा

चार नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फेही सत्तेतील वाट्यासाठी आग्रह राहणार आहे. जागा वाटपात कमी जागा दिल्यानंतरही महायुती म्हणूनच राष्ट्रवादीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्तेतील वाटा देखील चांगलाच पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह राहण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Mayor Election: Names to be Announced Monday Afternoon

Web Summary : Kolhapur's Mahayuti leaders will meet soon to discuss mayoral and deputy mayoral positions, aiming for power mirroring seat allocation. BJP vies for mayor, while Shinde's Sena eyes key posts. Names will be revealed Monday.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस