शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 18:38 IST

पश्चिम महाराष्ट्र-कोकणची वाहतूक सुलभ

कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला गती मिळणार असून तीन हजार ४११ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची पीएम गतिशक्तीअंतर्गत शिफारस राष्ट्रीय नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत गुरुवारी करण्यात आली. पीएम गतिशक्ती अंतर्गत हा मार्ग होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा हा मार्ग लवकरच पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला.उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाची शिफारस केली. पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांच्यात दळणवळणाची अधिक सुलभ वाहतूक होण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला २०१६ मध्ये मंजुरी दिली होती.मात्र, त्यानंतर दोनवेळा सर्व्हे होऊनही हा मार्ग रुळावर आला नाही. गत महिन्यात कोकण रेल्वेच्या गोव्यात झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या मार्गाबाबत चर्चा होऊन मध्ये व कोकण रेल्वेची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर हा मार्ग पूर्णत्वाकडे नेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला फायदा होणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचण्यास तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ होईल. परिणामी, कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.

पश्चिम महाराष्ट्र-कोकणची वाहतूक सुलभसध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. तर कोकणातील खनिजांची व फळांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चात होणार आहे. तर कोकणातील विविध उत्पादनांची वाहतूक पश्चिम महाराष्ट्रात करणे सोयीस्कर ठरणार आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. प्रवाशांसोबतच या दोन्ही भागांमधील विविध उत्पादनांची वाहतूक कमी खर्चात व सुरक्षित होईल. पश्चिम महाराष्ट्रातील साखर व इतर घटक जयगड बंदरावर नेण्यासाठी व कोकणातील फळे, खनिजे पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी हा रेल्वेमार्ग उपयुक्त ठरेल.  - डॉ. रामदास भिसे, वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे पुणे विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे