शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी व ग्रामसेवक यांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:30 IST

कोल्हापूर : तलाठी व ग्रामसेवक यांनी आप-आपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करावे. गावात रुग्ण वाढणार नाही यासाठी ग्राम समित्यांना ...

ठळक मुद्देतलाठी व ग्रामसेवक यांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले निर्देश

कोल्हापूर : तलाठी व ग्रामसेवक यांनी आप-आपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करावे. गावात रुग्ण वाढणार नाही यासाठी ग्राम समित्यांना सक्रीय करुन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  दिले.जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.ते म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात सर्व्हेक्षण करुन त्याची माहिती भरावी. रुग्णांचे स्वॅब घेवून अँन्टीजेन टेस्ट करावी. सर्व्हेक्षणाचे काम नाकारणाऱ्यांवर कारवाई करा. तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनीही सर्व्हेक्षण बरोबर होत की नाही याची गावात भेट देवून पाहणी करावी. प्रतिबंधक क्षेत्रात अंमलबजावणी करावी. तलाठी, ग्रामसेवक यांनी गाव न सोडता सक्रीयपणे काम करावे. अजिबात शिथिलता येवू देवू नका. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तुही नाहीत याचे फलक प्रत्येक आस्थापनाच्या दर्शनी भागात लावून या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, महापालिका, नगरपालिका क्षेत्रात या मोहिमेचे उल्लंघन करणारी दुकाने आठवडा भरासाठी सील करावीत. फेरीवाल्यांवरही कारवाई करावी.मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, काँटॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा. सर्व्हेक्षणामध्ये इली आणि सारीच्या रुग्णांना शोधून संदर्भीत करावे. नो मास्क नो एंट्रीचे उल्लंघन करणारी दुकाने सील करुन टाका. एचआरसीटी करणाऱ्या लॅबचा ग्रुप तयार करुन त्यावर अहवाल मिळावावा. त्यानुसार स्वॅब तपासणीसाठी पाठपुरावा करावा. त्या संदर्भात लॅबशी पत्रव्यवहार करुन स्वॅब कलेक्शन केंद्र उभे करायलाही सांगा.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनीही मार्गदर्शन केले.---फोटो कोलडेस्क ला कलेक्टर बैठक नावाने पाठवला आहे.ओळ : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर