शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबार्इंमुळे महिला आघाडीवर

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

प्रतिभाताई परदेशी : इंदुताई पाटणकर यांना ‘रणरागिणी नगुबाई माळी पुरस्कार’

वांगी : बहुजन समाजातील स्त्रियांना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली. सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढे आल्या, त्यावेळी त्यांना दगडाने मारहाण झाली. परंतु, तेच दगड घेऊन बहुजन समाजातील स्त्रिया सावित्रीबार्इंना विरोध करणाऱ्या समाजाच्या विरोधात उभ्या आहेत, असे प्रतिपादन विद्रोही चळवळीच्या राज्य अध्यक्षा प्रा. प्रतिभाताई परदेशी यांनी मंगळवारी केले.वांगी (ता. कडेगाव) येथे रणरागिणी नगुबाई माळी प्रतिष्ठानच्यावतीने क्रांतिवीरांगना श्रीमती इंदुताई पाटणकर यांना जाहीर करण्यात आलेल्या ‘रणरागिणी नगुबाई माळी पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रा. परदेशी बोलत होत्या. यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश मोहिते, डॉ. नामदेव माळी, अ‍ॅड. सुभाष पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्याध्यक्ष मोहनराव यादव, पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, प्रा. सर्जेराव खरात, कॉ. मारुती शिरतोडे, कॉ. जयंत निकम, कृष्णा कारखान्याचे संचालक पांडुरंग होनमाने उपस्थित होते. प्रा. परदेशी म्हणाल्या की, आज देशाच्या इतिहासात स्त्रियांनी कर्तृत्व व विचारांचा ठसा उमटविला आहे. हे विचार बहुजन समाजास समजून सांगितले पाहिजेत. इंदुताई पाटणकर यांचा सत्कार म्हणजे स्त्री-पुरूष समानतेचे आदर्श उदाहरण आहे. इंदुताई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी काम केले, तर स्वातंत्र्यानंतर आयुष्यभर शेतकऱ्यांच्या चळवळी, धरणग्रस्तांचे प्रश्न, परित्यक्ता, विधवा स्त्रिया यांच्यासाठी काम केले आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आहे. त्यामुळे आजही शेतात त्या चिवटपणे काम करीत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कीटकनाशकांचा नको तसा पिकावर मारा केल्यामुळे त्याचा जास्त परिणाम शेतीवर होऊन शेती नापीक होत होते. शेतकरी तीच कीटकनाशके पिऊन आत्महत्या करीत आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. आज शेतकरी जगला, शेतीला आधार मिळाला, तरच पुढच्या काळात भवितव्य आहे. अन्यथा भावी पिढ्या कधीही आपल्याला माफ करणार नाहीत.परशुराम माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. परदेशी यांच्याहस्ते श्रीमती इंदुताई पाटणकर यांना ‘रणरागिणी नगुबाई माळी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास पांडुरंग पोळ, हारूण मुल्ला, संपत मोरे, डॉ. विजय होनमाने, दत्ता चव्हाण, हणमंत पवार, अरुण पाटणकर, दादासाहेब माळी, विजयसिंह कदम, महादेव होवाळ, दादासाहेब सूर्यवंशी, बाळासाहेब वत्रे यांच्यासह मान्यवर, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सिद यांनी आभार मानले. (वार्ताहर)शेती, शेतकरी जगला पाहिजे...शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आहे. ही गोष्ट इतिहासात कुणीही सांगणार नाही. पण शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आहे, त्यामुळेच आजही शेतात त्या चिवटपणे काम करू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. आज शेती, शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. एकीकडे शेतीमध्ये नवनवीन बदल, तंत्रज्ञान येत आहे. ते स्व्ीाकारलेही पाहिजे, पण ते आत्मसात करताना दुसरीकडे निसर्ग लहरी बनत आहे. लहरी निसर्ग व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव यामुळे शेतकरी द्विधा मन:स्थितीत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कीटकनाशकांचा नको तसा पिकावर मारा केल्यामुळे त्याचा जास्त परिणाम शेतीवर होऊन शेती नापीक होत होते. शेतकरी तीच कीटकनाशके पिऊन आत्महत्या करीत आहेत. याबाबत कुठेतरी विचार व्हायला हवा. आधुनिकतेकडे जाताना शेतकरी शेती, शेतकरी जगला पाहिजे, याकडे दुर्लक्ष होता कामा नये. याबाबत शासनाने गंभीर होण्याची गरज निर्माण झाली आहे.शेती, शेतकरी जगला पाहिजे...शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आहे. ही गोष्ट इतिहासात कुणीही सांगणार नाही. पण शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आहे, त्यामुळेच आजही शेतात त्या चिवटपणे काम करू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. आज शेती, शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. एकीकडे शेतीमध्ये नवनवीन बदल, तंत्रज्ञान येत आहे. ते स्व्ीाकारलेही पाहिजे, पण ते आत्मसात करताना दुसरीकडे निसर्ग लहरी बनत आहे. लहरी निसर्ग व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव यामुळे शेतकरी द्विधा मन:स्थितीत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कीटकनाशकांचा नको तसा पिकावर मारा केल्यामुळे त्याचा जास्त परिणाम शेतीवर होऊन शेती नापीक होत होते. शेतकरी तीच कीटकनाशके पिऊन आत्महत्या करीत आहेत. याबाबत कुठेतरी विचार व्हायला हवा. आधुनिकतेकडे जाताना शेतकरी शेती, शेतकरी जगला पाहिजे, याकडे दुर्लक्ष होता कामा नये. याबाबत शासनाने गंभीर होण्याची गरज निर्माण झाली आहे.